केईएम रुग्णालयात महिलांचे रक्तदान" " घे भरारी रक्तदानासाठी"





(प्रतिनिधी-परेल)
८ मार्च हा 'जागतिक महिला दिन.! म्हणजे सर्व महिलांचा अभिमानाचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून गेली दोन वर्ष के.ई.एम. रुग्णालय रक्तपेढी आणि जीवनदाता संस्था याच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.
याप्रसंगी केईएम रुग्णालयातील समस्त महिला डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व इतर महिला स्टाफ रक्तदान शिबिरात सहभाग घेत असतात, याही वर्षी सर्व महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती कविता ससाणे, समुपदेशक 
ब्लड बँक, के ई एम रुग्णालय, परेल, यांनी केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने