तालुक्यातील म्हैसवाडी येथील 33 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अक्षय जनार्धन राणे, वय 33 राहणार म्हैसवाडी हा नेहमीप्रमाणे रात्रीला आपल्या शेतात झोपायला जात असतो मात्र काल दिनांक 7 मार्च रोजी गुरांच्या गोठ्यात रात्री साडे अकराच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती पोलिसांना माहिती पडताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शरीर शवविच्छेदना करिता पाठवले पुढील तपास पोलिस करीत आहे.
Tags
news
