शिरपूर - दिनांक 5 मार्च 2022 वार शनिवार रोजी भरवाडे ता. शिरपूर येथे जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान (वनावल गणाचे माजी पंचायत समिती सदस्य व विद्यमान साखर कारखाना संचालक) आदरणीय बापूसाहेब श्री भरत भिलाजी पाटील यांनी भूषवले त्याच प्रमाणे प्रमुख अतिथी श्रीमती ताईसो ममता ईश्वर चौधरी (पंचायत समिती सदस्या भरवाडे), सौ भारतीताई दिलीप पटेल (सरपंच भरवाडे ),नानासो श्री डी पी बुवा (शि. वि.अधिकारी ) डॉ.निता सोनवणे मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी), बापूसो श्री आव्हाड साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी), ताई सौ सुरेखा पाटील मॅडम ,तात्यासो. श्री.अनिल महिरराव (केंद्रप्रमुख), शिक्षक संघटनेचे मान्यवर आबासो. शरद सूर्यवंशी, बापुसो.श्री छोटू राजपूत सर, सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षक वृंद ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री बापूसाहेब भरत पाटील यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली, सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेतील इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून तात्यासो. श्री अनिल महिरराव केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील चि. अल्पेश चंपालाल पटेल या मुलाने CA पदवी मिळवल्याबद्दल व डॉ. चि. सोहन विजय चौधरी यांना मध्ये MD साठी प्रवेश मिळाल्याबद्दल मराठी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने करण्यात आली. कार्यक्रमात एकूण 19 गीतांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांना शेवटपर्यंत मंत्रमुग्ध ठेवले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री दंगल भोई, श्री ईश्वर कढरे,श्री रामदास वाघ, श्री मणिलाल पाटील, श्री रत्नाकर सोनवणे, श्रीमती आशा कदम व श्री.महावीर शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रत्नाकर सोनवणे, प्रास्ताविक श्री मणिलाल पाटील व आभार श्री महावीर शिंदे सर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री भरत बापू यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मी आजपर्यंत बरेच कार्यक्रम बघितले परंतु असा कार्यक्रम तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नाही असा जि. प.मराठी शाळा भरवाडे येथे साजरा करण्यात आला.असे कार्यक्रम CBSC स्कूल, इंग्लिश मीडियम व कॉलेज गॅदरिंग मध्येच होतात.अतिशय सुंदर असे नियोजन व सुसुत्रता शाळेतील शिक्षकांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत असणारी गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहात. यासाठी प्रत्येक पालकांनी देखील आपल्या पाल्याला शाळेत रोज पाठवून त्याला चांगले शिक्षण दिले पाहिजे. ग्रामीण भागातील पालकांनी देखील जागरूकता बाळगली पाहिजे. व आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. अशाप्रकारे शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले व त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ताईसो निता सोनवणे मॅडम, शि.वि. अधिकारी व मुख्याध्यापक राज्यआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री वाल्हे सर यांनी शाळेविषयी मनोगतात गौरवोद्गार काढून शाळेला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास श्री दिलीप भाई पटेल, पोलीस पाटील संजय भाई पटेल, डॉ.बन्सीलाल चौधरी, डॉ. अशोक भाई चौधरी, श्री छोटूभाई चौधरी, श्री अविनाश पटेल, सौ अनिता पाटील, सविता पाटील, श्री देविदास कोळी, श्री नानासाहेब भिल, श्री सतीश पटेल, श्री मोहन पटेल,श्री चंपालाल पटेल, श्री अशोक पटेल व सर्व मान्यवर ग्रामस्थ व आमच्यावर प्रेम करणारे आमचे मान्यवर गुरुजन वृंद यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Tags
news
