पुणे: इंदापूर तालुक्याच्या माजी सभापती पुष्पाताई रेडके यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यातील प्रथम 5 आदर्श पंचायती त्यांची निवड करण्यात आली .7 मार्च रोजी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रेडके यांना सन्मानित करण्यात आले .
पुष्पाताई रेडके यांच्या विषयी आपण माहिती घेऊ
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर तालुक्याचे नाव इतिहासात अजरामर आहे. अशा या गौरवशाली इंदापूर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याचा बहुमान पुष्पाताई अविनाश रेडके यांना मिळाला. पुष्पाताई रेडके यांचा जन्म 10 जून 1994 रोजी झाला.वनगळी गावातील पारेकर कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षणातील विज्ञान शाखेची पदवी त्यांनी शारदानगर,बारामती येथून प्राप्त केली आहे. पती अविनाश रेडके पोलीस दलात सेवा बजावत आहेत.
गृहिणी असलेल्या पुष्पाताईंनी फेब्रुवारी 2017 साली सर्वसाधारण महिला प्रवर्गातून बिजवडी गणातून पंचायत समितीसाठी निवडणूक लढविली.इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते व माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी रेडके कुटुंबावरती विश्वास दाखवून पुष्पाताई रेडके यांना उमेदवारी दिली. जनतेच्या विश्वासास पात्र ठरत त्यांनी ही निवडणूक 1380 मतांनी विजय मिळवून जिंकली.
राजकारण,समाजकारण करत असताना पुष्पताईंचे कुटुंबाकडे ही लक्ष असते. पुष्पाताई यांचे सासरे हरिदास रेडके हे पडस्थळ गावचे सरपंच होते. त्यांचाच राजकीय वरसा पुढे पुष्पाताई पुढे चालू ठेवला. इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांनी प्रगत होऊन सुशिक्षित झाले पाहिजे यासाठी नेहमीच त्यांची तळमळ असते.
त्यांच्या बिजवडी गणातील 9 जिल्हा परिषदेच्या शाळा I S O नामांकन प्राप्त आहेत. शिक्षणाचा दर्जा चांगला राहावा यासाठी नेहमीच त्या शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या संपर्कात असतात.सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. बिजवडी गणातील शिरसोडी येथे माजी मंत्री श्री. हर्षवर्धनजी पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे भव्य अश्या 10 वी.पर्यंतच्या शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्याचे भाग्य त्यांना लाभले. कै.श्री. नानासाहेब व्यवहारे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थी प्रज्ञा शोध परीक्षेत अव्वल यावेत यासाठी 1100 विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते. शिक्षक पुरस्कार असोत किंवा विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असो यासाठी पुष्पाताई रेडके नेहमीच पुढे असतात.
पडस्थळ,आजोती, पिंपरी खुर्द,कालठण नं.2,गंगावळण, सुगाव, टाकळी (झेंडे वस्ती),चिंदादेवी या ठिकाणी महिला मेळावे आयोजित करून तसेच संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व वाण वाटपाचे कार्यक्रम करून शेकडो महिला व माता-भगिनींना एकत्र करण्याचे काम केले.त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी भूषणावह असणाऱ्या महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी गौरीताई तावरे - थोरात यांचा 'मी जिजाऊ बोलतेय' या एकांकिकेचे आयोजन केले व जिजाऊ आई साहेबांचा आदर्श महिलां समोर मांडला.
कोवीड- 19 च्या काळामध्ये सर्वत्र अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा काळात पंचायत समितीच्या सभापती या नात्याने पुष्पाताई रेडके यांनी आरोग्य विभाग सांभाळत लोकांना धीर दिला .रुग्णांसाठी हॉस्पिटल, बेड उपलब्ध करून दिले.पुष्पाताई यांचे दिर महेंद्र रेडके यांचाही त्यांचा कार्यात मोला वाटा आहे. अधिकारी वर्ग यांना सोबत घेऊन गरीब महिला, बिगारी कामगार, पानमळा कामगार,मासेमारी करणारे बांधव, विधवा महिला अशा गरजू लोकांना अन्नधान्य किट,किराणा किट, कपडे व साड्या इत्यादी संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केले.
ग्रामीण भागात आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा असतात. परंतु अशाही अडचणीच्या वेळी पुष्पाताईंनी गावोगावी गरोदर माता, 0 ते 3 वर्षापर्यंतची बालके, विद्यार्थ्यांच्या तपासण्या, covid-19 लसीकरण मोहीम, त्याच सोबत महिला आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली. त्याचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स,नर्स, आशा वर्कर्स,स्वयंसेवक, सामाजिक संस्था इत्यादी घटकांचा आधार घेत त्यांना प्रोत्साहित करत पुष्पाताई रेडके सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी धनगर समाजाच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांनी इंदापूर तालुका पंचायत समिती चे सभापतीपद भूषवले. माजी मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील,जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना नेहमी असते .
सलग 2 वर्षे पुष्पाताई रेडके यांच्या बिजवडी पंचायत समिती गणातील रेडकेवस्ती शाळा - कळाशी. (2017) व जि. प. प्राथ. शाळा बिजवडी.( 2018) दोन शाळांना पुणे जिल्हा परिषदेचा 'आदर्श शाळा पुरस्कार' मिळालेला आहे. यावरून पुष्पाताई रेडके यांचे शैक्षणिक क्षेत्रातले कार्य, त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ व गुरुजनां वरील प्रेम अधोरेखित होते.
पुष्पाताई रेडके ज्या पडस्थळ. ता. इंदापूर गावात राहतात त्या गावची ग्रामपंचायत निवडणूक (2017 ते 2022)बिनविरोध करण्यात यशस्वी झाल्या.यांच्या प्रयत्नामुळे पडस्थळ गावची ग्रामपंचायत निवडणूक सलग 6 व्यांदा बिनविरोध पार पडली.
अशा या इंदापूर तालुक्याच्या कर्तृत्ववान महिला व्यक्तिमत्वास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Tags
news
