प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या घरच्यांनी तरुणाला जीवंत जाळले




नाशिक -प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या घरच्यांनी तरुणाला जीवंत जाळले आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोनेर नाशिक येथील एका घटनेने परिसरात खळबळ माजली येथील एका तरुणाला जीवंत जाळल्याची घटना आहे. यामध्ये तरुण 50 टक्क्यांहून अधिक भाजला असून त्याला देवळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.लोहोनेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांना हे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र या मुलामुळे ही स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने