मध्यप्रदेश राज्यातून केमिकल घेऊन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे जाणारा टँकर राज्य सीमेवर बिजासन घाटात उतारावर अनियंत्रित झाल्याने भरधाव वेगाने डिव्हायडरला धडक देत विरुद्ध बाजूला पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
मध्यप्रदेश राज्यातील ठिकरी येथून सीजी 04 जेए 5435 क्रमांकाचे टँकर गुरुवारी रात्री केमिकल भरून महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मुंबई आग्रा महामार्गाने जात असतांना राज्य सीमेवर बिजासन घाटात उतारावर टँकरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर हेलकावे घेत अनियंत्रित
झाला आणि महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन धडकला. विरुद्ध
बाजूच्या लेनवरून खड्यात पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात टँकर चालक अरुण कुमार बिहारीलाल ठाकुर वय 25 रा. रा गोडी जि महुबा उत्तर प्रदेश यास किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने दुसऱ्या बाजूला दुसरे वाहन होते नाहीतर मोठा अपघात झाला असता. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी आपल्या पथकासह धाव घेत घटनास्थळा ची पाहणी केली, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहेत
Tags
news
