मोहन चौकातील जांगीड ज्वेलर्समध्ये आलेल्या बुरखाधारी महिलेने ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे . ही घटना ८ फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घडली . ९ फेब्रुवारीला दुकानमालकाने या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पंकज प्रवीणकुमार जांगीड ( ३८ , रा . रॅलीज प्लॉट , बाळापूर फैल , खामगाव ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली . एक बुरखाधारी महिलेने दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात आली . तिने मंगळसूत्र दाखविण्याची मागणी केली . मंगळसूत्र दाखवले असता नजर चुकवून तिने मंगळसूत्र चोरले आणि तिथून निघून गेली . तिने चोरून नेलेले मंगळसूत्र ११.८० ग्रॅमचे ( किंमत ५५ हजार ) आहे . तपास नापोकाँ भानुदास तायडे करत आहेत
Tags
news
