आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा




शिरपूर : आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा उद्घाटन सोहळा रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी संस्था अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न होत आहे.


शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, टेक्स्टाईल पार्क चेअरमन चिंतनभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये संपन्न होत आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे संचालक मंडळ यांनी केले आहे.


-------

-----------

या शैक्षणिक भव्य कॅम्पस मध्ये "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" हा मल्टीपर्पज हॉल राहणार असून विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोगात येईल.


मेन बिल्डिंग मध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा पूर्वी पासून निर्माण करण्यात आल्या आहेत. आता या मेन बिल्डिंगच्या प्रशस्त इमारतीचे रंगकाम नव्याने पूर्ण होत असून येथील सुखसुविधा चांगल्या रीतीने पुन्हा नव्याने निर्माण करण्यात येत आहेत. अत्याधुनिक संगणक कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात, नाशिक विभागात आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाने उत्कृष्ट संस्था म्हणून पारितोषिक देखील पटकावले आहे. संस्थेने आपले नाव सुवर्णाक्षरांनी नेहमीच कोरल्याचे अनेकदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे सिद्ध झाले आहे. 


शिरपूर शहर व तालुक्यातील असंख्य विद्यार्थी, पालकांचा ओढा व आग्रह आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नेहमीच असतो. यासाठी विस्तारित इमारतीचे काम पूर्ण झाले असून नव्याने अजून बिल्डिंगचा विस्तार करण्याचे भाईंनी ठरविले आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी भाईंच्या पावलावर पाऊल ठेवून राजगोपाल भंडारी यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. 


आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये एच. आर. पटेल कला महिला महाविद्यालय, आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, एच. आर. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आर. सी. पटेल प्राथमिक शाळा, एच. आर. पटेल प्राथमिक शाळा तसेच मराठी माध्यम व सेमी माध्यम चे 7,500 पेक्षा जास्त विद्यार्थी मेन बिल्डिंग मध्ये शिक्षण घेतात. यापूर्वी याच कॅम्पस मध्ये आर. सी. पटेल इंग्लिश मेडिअम स्कूल, सिनिअर कॉलेज, उर्दू मेडिअम स्कूल, डी. एड. कॉलेज, बी. एड. कॉलेज, फार्मसी कॉलेज यासारखे अनेकविध कॉलेज याच मेन बिल्डिंगच्या कॅम्पसमध्ये भरविण्यात येत होते.


आता संस्थेच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स ला नवे रूप देण्यात येत असून हजारो खेळाडू आजपर्यंत उदयास येऊन त्यांनी संस्थेतर्फे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून भव्य कॅम्पस ची निर्मिती या ठिकाणी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. या बिल्डिंगमधून हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात, देशभरात व परदेशात मोठ्या हुद्द्यांवर चांगल्या पगाराच्या नोकरी प्राप्त केलेले आहेत. याच मेन बिल्डिंग मधून असंख्य विद्यार्थ्यांनी क्रीडा, शैक्षणिक व अनेक क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केले आहे. दहावी, बारावीचे बोर्ड परीक्षेत यश पटवणारे विद्यार्थी असो क्रीडा क्षेत्रात राज्यात व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त करणारे खेळाडू असे असंख्य विद्यार्थी या कॅम्पस मधून घडले आहेत. म्हणून या कॅम्पस मधील विद्यार्थी व शिक्षकांची गरज पाहता या भव्य शैक्षणिक संकुलामध्ये अतिशय सुंदर, आकर्षक व अनेक सुविधांनी युक्त अशा "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल"चे निर्माण करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने