अफवांना बळी पडू नये पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत मलकापूर - उमेश ईटणारे



मलकापूर शहर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कर्नाटक राज्यामध्ये हिजाब वरून घडलेल्या घटनेच्या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे कारणावरून बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे . तरी सदर घटने संबंधित कोणीही आक्षेपार्ह  र्व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये . अशी पोस्ट व्हिडिओ टाकल्यास टाकनारा व इतर संबंधित यास जबाबदार धरून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल . मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये आज शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत बैठकीत पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सांगितले शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मलकापूर शहरपोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधा तसेच जो कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने