एस.व्ही.के.एम. मुंबई व ऍम्युचर फुटबॉल असोशिएशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मुकेश पटेल सीबीएसई स्कूल मध्ये दि. २ ते ४ मार्च पर्यंत जिल्हास्तरीय दिवसरात्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन




शिरपूर : मुकेश पटेल सीबीएसई स्कूल मध्ये दि. २ ते ४ मार्च या कालावधीत एस.व्ही.के.एम. मुंबई व ऍम्युचर फुटबॉल असोशिएशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिवसरात्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


एस.व्ही.के.एम. मुंबई व ऍम्यचुअर फुटबॉल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या मैदानावर दि. २ मार्च पासून जिल्हास्तरीय दिवसरात्र  फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत.

सदर स्पर्धेसाठी एकूण ४० संघांचा समावेश होत आहे. या स्पर्धेसाठी शाळेच्या मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे.


या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ऍम्यचुअर फुटबॉल असोशिएशन, भारत अध्यक्ष सुनीलकुमार, ऍम्यचुअर फुटबॉल असोशिएशन, महाराष्ट्र अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्हॉलीबॉल असोशिएशन भारत अध्यक्ष विपिन चहल, ऍम्यचुअर फुटबॉल असोशिएशन भारत मुख्य कार्यकारी अधिकारी बाबा बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने