- प्रख्यात साहित्यिक कसुमाग्रज यांच्या जन्मदिन,मराठी भाषा दिनानिमित्त महात्मा फुले स्मारक शहादा येथे युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत भव्य असे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.प्रदर्शनास वाचकांनी भेट देत पुस्तक खरेदीसह विविध पुस्तके व त्याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार,निवेदक विष्णू जोंधळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे,प्रा.मकरंद पाटील,ज्येष्ठ साहित्यिक उषा महाजन,सामाजिक कार्यकर्त्या अनामिकाताई चौधरी,हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, पंडित जाधव, रमाशंकर माळी,ग्रामीण साहित्यिक करणसिंग तडवी,अनिसचे राज्य कार्याध्यक्ष विनायक सावळे,कवी भूषण गवळे,नितीनभाऊ कोळी,युवकमित्र परीवाराचे प्रवीण महाजन,मनोज वारूडे,बादलसिंग गिरासे,संतोष महाजन यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनस्थळी मराठी भाषेतील विविध प्रकारची ५०० पेक्षा अधिक पुस्तके वाचकांना पाहणीसाठी ठेवण्यात आली होती.तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहादा शाखेतर्फ पुस्तक खरेदी कक्ष उभारण्यात आला होता.यावेळी वाचकांनी पुस्तके खरेदी करत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी वाचन चळवळ वाढवण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले तर उदघाटक विष्णू जोंधळे यांनी शहादा शहरासारख्या ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढवणेसाठी पुस्तक प्रदर्शन उपक्रम राबवणेची गरज असल्याचे प्रतिपादन केले.ज्येष्ठ कवी करणसिंग तडवी यांनी सूत्रसंचालन केले तर रमाशंकर माळी यांनी आभार मानले.
