रोटरी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन* दोडाईचा (अख्तर शाह)



 दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांत शालेय जीवनापासून विज्ञानाबाबत गोडी निर्माण होऊन त्यांच्या कल्पकतेला व संशोधन वृत्तीला विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने ' राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे ' औचित्य साधून  शालेय स्तरावर ' प्रकाशमान ' विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.      
        या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृषी व अन्नसुरक्षा, ऊर्जा संसाधने आणि संवर्धन, आरोग्य, पर्यावरणीय समस्या व चिंता, विज्ञान आणि दैनंदिन जीवन, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विज्ञानाचा सकारात्मक वापर होण्याच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीने एकूण 154 उपकरणांची आकर्षक मांडणी केली. परीक्षकांना व उपकरणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व  पालकांना उपकरणांविषयी समाधानकारक माहिती सांगून त्याचे महत्त्व पटवून दिले.
         विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन यशस्वी जीवन जगता यावे यासाठी शाळेचे अध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर प्राचार्य श्री एम. पी. पवार, पालक यांचे प्रोत्साहन व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे.
     प्रदर्शनातील इ.1ली ते 4 थीच्या गटात कृष्णा ओतारी प्रथम,आदित्य रुपचंदानी व परिधी रूपचंदानी द्वितीय, आयुष्यमान बच्छाव व स्मित शाह तृतीय.इ.5 वी ते 7 वीच्या गटात अर्णवी पाटील व यज्ञिका गोराणे प्रथम, श्रेयस माळी द्वितीय, सोहम ठाकरे व मानव कपाडी तृतीय,तर इ. 8 वी ते 10 वीच्या गटात वेदांत गिरासे व नोमान खान प्रथम, मोली अग्रवाल व मिहिका राजपूत द्वितीय, तृप्ती सदाराव व निमिषा पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
        परीक्षक म्हणून श्री एन. के.ठाकरे, श्री आर. ए. चित्ते, श्री प्रशांत चौधरी व श्री मिलिंद सोनवणे यांनी काम पाहिले.
   या प्रदर्शनाला बहुसंख्य पालकांनी भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी श्री  राहुल भावसार व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने