ही घटना काल दि ७ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास मोताळा तालुक्यातील वाघजाळ ते टाकळी मार्गावर टाकळी शिवारात घडली . संजय अमरसिंग चव्हाण ( ३६ , रा . गुळभेली , ता . मोताळा ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . ||| पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार , संजय चव्हाण त्यांच्या ताब्यातील बजाज डिस्कवर मोटरसायकलने ( क्र . एमएच २८ ईएन ३६ ९ ८ ) वाघजाळ ते टाकळी मार्गावरून जात असताना टाकळी शिवारातील टाकळी येथील अशोक जोशी यांच्या शेताजवळ मोटरसायकल घसरली . यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आला . बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
Tags
news
