आयत्या पिठावर रेगोट्या मारणे राष्ट्रवादीने बंद करावे-ॲड. शरद जामदार प्रतिनिधी दत्ता पारेकर




 पुणे :बावडा गावच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बावडा ग्रामपंचायतीने2020 पासून पाठपुरावा केला असल्याने जिल्हा परिषदेने या पाणीपुरवठा मंजुरी दिली असल्याने राज्यमंत्र्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नये असे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी व्यक्त केले .
  बावडा गावच्या विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी 3 लाख 77 हजार रुपयांच्या निधीस जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने शुक्रवारी ( दि. 4 फेब्रु. ) प्रशासकीय मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली होती. पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याची माहिती मिळताच विरोधक चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सदरची विस्तारित नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे बारावा फाटा -अरगडे वस्ती- घोगरेवस्ती- रत्नप्रभादेवीनगर येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्याचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने