वाहन चालकाचे नियंत्रण सुटून 1 ठार तर 7 जखमी चिखली तालुक्यातील घटना
मलकापूर - उमेश ईटणारे
अंत्यसंस्कारासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून टाटा सुमो वाहन उलटले . अपघातात १ ठार तर ७ जण जखमी झाले . ही घटना आज , ८ फेब्रुवारीला सकाळी ११ च्या सुमारास चिखली- खामगाव रोडवरील करणखेड फाट्याजवळ घडली . उमर शहा कंकर शाह ( ५० , रा . मकरध्वज खंडाळा , ता . चिखली ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . मकरध्वज खंडाळा येथील ८ जण अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अंत्यसंस्कारासाठी टाटा सुमोने ( क्र . एमएच १२ जीएन १०४ ९ ) जात होते . चिखली- अमडापूर दरम्यान असलेल्या करणखेड फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली उलटले . यात उमर शाह कंकर शाह जागीच ठार झाले तर युसूफ शाह हबीब शाह ( ४५ ) , मुस्तकीन शाह बिस्मिल्ला शाह ( ३१ ) , मुजीब शाह रऊफ शाह ( ३० ) , मोहम्मद साहब हबीब शाह ( ३४ ) , आरेफाबी समद शाह ( ४७ ) , मदिनाबी साहीन शाह ( ३५ ) , फतेमाबी युसूफ शाह ( ६० , सर्व रा . मकरध्वज खंडाळा , ता . चिखली ) हे जखमी झाले . घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . जखमींना तातडीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . जखमींपैकी काहींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे . तपास अमडापूर पोलीस करीत आहेत
Tags
news
