शिरपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत जिल्हा धुळे तालुका शिरपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला स्थापना होऊन आज रथसप्तमीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या प्रसंगाचे औचित्य राखून शिरपूर शहरात रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पात रुग्णाला लागणाऱ्या वस्तू फाऊलर बेड ,वाँकर व्हीलचेअर कमोड, चेअर इत्यादी साधने अनामत रक्कम घेऊन नि:शुल्क वापरण्यासाठी ठरावीक कालावधीसाठी देण्यात येतात, व काम झाल्यावर त्या वस्तू परत करता येतात. डिपॉझिट परत मिळते. या उपक्रमाचे उद्घाटन शिरपुर मधिल नामांकित डॉक्टर श्री. राहुल पाटील यांनी केले. सुत्रसंचालन श्री अमोलजी धर्माधिकारी यांनी केले. या प्रसंगी जनकल्याण समितीचे अध्यक्ष देवगिरी संभागाचे कार्यवाह श्री बाळकृष्ण खानवेलकर आरोग्य आयाम प्रमुख डॉक्टर आनंद पाटील, जनकल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुधीर साठे, संघाचे जिल्हा संघचालक मा.श्री संजय बापू चौधरी उपस्थित होते. तसेच जनकल्याण समिती चे जिल्हा पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिरपूर मध्ये जनकल्याण समूहाची स्थापना करण्यात आली या समुहाकडुन अभ्यासिका,संस्कार केंद्र,फिरती विज्ञान प्रयोगशाळा सारखे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील
या समितीत श्री सतीश माळी ,डॉ. श्री दिनेश सुशिर,श्री व सौ राजेंद्रजी बाविस्कर,श्री रमेश कुलकर्णी ,डॉ.श्रीलोकेश वैद्य, सौ अनुराधा दंडवते सौ. सोनाली पाटील सौ.अश्विनी जोशी,डॉ. सौ सीमा वैद्य
प्रकल्प प्रमुख म्हणून श्री अविनाश दंडवते हे काम बघणार आहेत बघणार आहेत.
या सेवेचा लाभ घेण्यासाठीदंडवते नगर पाण्याच्या टाकी समोर शिरपुर. येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले
Tags
news
