धुळे प्रतिनिधी : धुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. धुळे शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या मा. किरणताई पाटील ह्यांना महाराष्ट्र शौर्यवती पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला असून त्याबाबत अधिकृत माहिती पुरस्कार समिती अध्यक्ष प्रशांत गोरे ह्यांनी दिली सदर पुरस्कार हा कोणत्याही प्रकारचे अर्ज मागवून देण्यात येत नाही ह्या पुरस्कारासाठी निवड समितीने स्वतः निवड केल्यानंतर महाराष्ट्रामधून एकाच तरुणीला हा पुरस्कार दिला जात असतो.
किरणताई ह्यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे त्या नेहमीच महिला अन्यायाविरुद्ध कार्य करीत असतात तसेच अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत असतात तसेच स्त्री भ्रूण हत्येवर ते गावोगावी जाऊन व्याख्यानाच्या मदतीने मार्गदर्शन करून स्त्री जन्माचे स्वागत करावे हे सांगत असतात , बेटी बचाव बेटी पढाव ह्यासाठी देखील त्या प्रयत्न करीत आहेत.
महिलांनी उद्योग क्षेत्राकडे पाऊल टाकावे ह्यासाठी देखील त्या कार्य करीत आहेत .
महिलांनी व तरुणींना आत्मसरक्षणाचे धडे देखील त्यांनी दिले आहेत, तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळावे ह्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. समाजकारण फक्त बोलून होत नसते तर ते आचरणात देखील आणावे लागते स्त्री भ्रूण हत्येवर त्या काम करीत आहेत , त्यांनी स्वतः रस्त्यावर सापडलेल्या एका अनाथ मुलीला मातृत्व बहाल केले आहे . त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनाथांची माय पदश्री मा. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतः त्यांची भेट धुळे येथील त्यांच्या घरी घेतली होती. त्यांना सन 2021 चा इंद्रधनुष्य टीम कडून इस्पायरिंग वूमेन हा पुरस्कार देखील देण्यात आला होता . तसेच सामाजिक कार्याबद्दल आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असे देखील समिती अध्यक्ष ह्यांनी सांगितले. ८ मार्च जागतिक महिला दिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल असे अध्यक्षांनी सांगितले त्यांच्या निवडी बद्दल धुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे .
Tags
news
