फक्त स्कूल बसला मिळणार करात शंभर टक्के सवलत




धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : शालेय प्राधिकरणाच्या मालकीच्या आणि केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणाऱ्या स्कूल बस, शालेय प्राधिकरणाने कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या आणि केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणाऱ्या स्कूल बस, केवळ शाळेतील मुलांची ने- आण करण्यासाठी शालेय प्राधिकरणाव्यतिरिक्त इतरांची मालकी असलेल्या किंवा कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या स्कूल बसला शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमामधील तरतुदीन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत करामध्ये शंभर टक्के सूट दिली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने