शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत राबविले शून्य कचरा (झिरो वेस्ट) संकल्पनेतून नाविण्यपूर्ण पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत राबविले शून्य कचरा (झिरो वेस्ट) संकल्पनेतून नाविण्यपूर्ण पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

शासन स्तरावर हवामान व पर्यावरण बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान २.० व भारत सरकारद्वारे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची प्रभावी अंमलबजावणी करणे सुरु असून शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
 शून्य कचरा (झिरो वेस्ट) संकल्पनेतून नाविण्यपूर्ण पाककला स्पर्धा शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रशासक प्रमोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेतर्फे आयोजित पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सहभागींचे वैशिष्ट म्हणजे सर्व वयोगटातील पाककला अवगत असलेले तरुण, वयस्क, गृहिणी व गृहस्थ यात सहभागी होते. पाककला स्पर्धेसाठी आरोग्यहितकारी पदार्थ, पर्यावरणपूरक सजावट व संदेश अशा तीन भागात कलाकृतीची विभागणी करण्यात आली होती. या कार्यक्रमात कोणत्याही कचरा निर्माण होणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात येऊन शशून्य कचरा संकल्पनेतून कार्यक्रम पार पडला. तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पदार्थ सजावट करिता पर्यावरणपूरक वस्तुचा वापर करण्यात आला. महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली की आपण समारंभ साजरे करतांना कोणत्याही नैर्सिगक साधन संपत्तीचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी कोणताही समारंभ साजरे करतांना शून्य कचरा संकल्पनेतून कार्यक्रमांचे आयोजन करावे असे कार्यक्रमाप्रसंगी मुख्यधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले.
सर्वच सुगरण कलाकारांचा किंवा स्पर्धाकांचा संदेश हा पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, आरोग्यवर्धक पौष्टिक अन्न खाणे, ऊर्जा संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर पॅनलचा वापर, आरोग्यासाठी व्यायामची महती, प्लास्टीकमुक्त होऊन पर्यावरण संवर्धन होईल असे व्यक्त करणारे होते. त्रीरस, पेरुसरबत, पुदिनालिंबु सरबत, पाचकरस व क्षुधावर्धक सॅलेडच सॅलेड, फळांचे सलाड, दुधी, लालभोपळा, गाजर, बीट, ओले नारळ-मावा हलवा रुचकर गुळशेव, पोषक अहळीव लाडुही, चिंचेची चटणी, पुदीना चटणी, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, बीटचटणी, ओले खोबरे-तीळ चटणी, वाटलेल्या डाळीची चटणी, पुरी, एडणी, थालीपीठ, डोसा, पालक-बिट पुरी, भाजणीचे थालीपिठ, फुलके, भाकरी अश्या पदार्थांची हजेरी पाककला स्पधेत होती. सर्व पदार्थाची व स्पर्धकांचे कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे व माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या कडून कौतुक करण्यात आले व आवाहन करण्यात आले की पुढील वर्षी यापेक्षा जास्त संख्येने स्पर्धक भाग घेतील.
सदर कार्यक्रमाप्रसंगी परिक्षक म्हणून सर्व जबाबदारी श्रीमती रीटा पटेल, डॉ.जयश्री निकम, डॉ. श्वेता बेलगमवार, डॉ. निता सोनवणे यांनी सांभाळली. सदर पाककला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक कल्पना प्रविण माळी व श्वेता चेतन भावसार, द्वितीय पारितोषिक गायत्री उदय पाटील व सोनल योगेश जैन, तृतीय पारितोषिक पौर्णिमा विंचूरकर व कोमल सोनू सोनार, उत्तेजनार्थ पारितोषिक मुस्कानजोया इरफान लोहार विजेत्या ठरल्या. 
माझी वसुधंरा अभियान अंतर्गत जनजागृती बाबत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मत मांडले. कार्यक्रम प्रसंगी डॉ.निता सोनवणे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके यांनी केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका संगिता देवरे, रेखा सोनार, नाजेराबी शेख, छाया ईशी, श्रीमती स्नेहल नेरकर, कक्कूबेन पटेल, किरनबेन पटेल, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, विभाग प्रमुख भाईदास भोई, नोडल अधिकारी सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, शहर समन्वयक दिव्या पाटील, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, प्रज्ञाशील निकम, मनोहर थोरात आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने