शिरपूर : उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. तपनभाई पटेल युवा मंच तर्फे अनाथ मतिमंद मुलांना अन्नदान करण्यात आले.
युवा नेते, टेक्सटाइल पार्क चेअरमन तथा श्री विले पार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. तपनभाई पटेल युवा मंच तर्फे "अन्न हे पूर्णब्रह्म" या युक्ती प्रमाणे करवंद नाका येथील अनाथ मतिमंद मुलांना अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी टेक्सटाइल पार्क चे डायरेक्टर जनकभाई पटेल, पंकीलभाई पटेल, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रोजेक्ट डायरेक्टर गुलाबराव गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमाला पं.स.उपसभापती प्रतिनिधी योगेश बोरसे, पं.स.सदस्य यतिश सोनवणे, भाजपा तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, पिपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, पंडित पाटील, मनोहर पाटील, विनोद पाटील, मनजीत पवार, किशोर चव्हाण, लाला राजपूत, भुपेंद्र गुजर, सतिश पाटील उपस्थित होते.
एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रोजेक्ट डायरेक्टर गुलाबराव गुजर यांनी उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या बद्दल गौरवोद्गार काढून स्व. तपनभाई युवा मंच च्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्व. तपनभाई पटेल युवा मंच चे अध्यक्ष संदीप कुवर, राजवर्धन पवार, महेश राजपूत, सुनील चौधरी, भैय्या चौधरी, हरीश गुजर, सावन सोनवणे, निलेश पाटील, चंद्रशेखर राजपुत, अजिंक्य शिरसाठ, अजय सावळे, दिपक बागुल, हंसराज चौधरी, नितीन सावळे, महेश निकुम, शिवम सोनार, मयुर कोळी, समर्थ चौधरी, पारस सोनार, प्रणव भदाणे, सुमित पाटील, केतन पंडित आदी सदस्यांनी प्रयत्न केले. आभार वनावल गावाचे सरपंच मनोहर पाटील यांनी मानले.
Tags
news
