मलकापूर येथे बेवारस स्थितीमध्ये अज्ञात इसम 3 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भाजी मंडी परिसरात मृतावस्थेत आढळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गजानन निनाजी राठोड वय 48 राहणार आनंद सोसायटी मलकापूर. भाजी मंड परिसरात गेले असता त्यांना 75 वर्षीय इसम मृतावस्थेत दिसला या घटनेची माहिती यांनी शहर पोलीस स्टेशन यांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अज्ञात इसम बेवारस असल्याने त्याचे शरीर उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे शवविच्छेदना करता क राखून ठेवले आहे. अज्ञात इसमाचे वर्णन उंची पाच फूट सडपातळ बांधा रंग गोरा उजव्या हाताला ओम गोंदलेलं अंगात फुल बायाचे मळकट पांढऱ्या रंगाचे शर्ट वरील वर्णनाचा अज्ञात इसम ओळख पटविण्याचे पोलिसांचे आव्हान. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास एपीआय सुखदेव भोरकडे करीत आहे.
Tags
news
