भीक मागून जमा केलेली वर्गणी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करा- एस.टी.कर्मचारी मलकापूर- उमेश इटणारे



मागील तीन महिन्यापासून बेमुदत पुकारलेल्या संप दुखवटा बाबत २६जानेवारी रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागून वर्गणी जमा केलेली जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करावी अशी मागणी मलकापूर एसटी कर्मचाऱ्यांनी ०३ जानेवारी रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना केली.
    राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मलकापूर आगार बुलढाणा विभाग यांनी भीक मागून जमा केलेले वर्गाने रुपये ३०५  हे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात यावे असे निवेदनामध्ये नमूद आहे निवेदनावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने