नांथे गावात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव चे आयोजन




नांथे गावात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव चे आयोजन

महेंद्र सिंह राजपूत,

शिरपूर तालुक्यातील होळनांथे परिसरात नांथे या गावात महाशिवरात्रि पर्व साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने गावात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव साजरा करण्यात येत असून भागवत कथा प्रवचनाचे व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे .आणि या पवित्र आयोजनाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


दिनांक 23 फेब्रुवारी पासून सदरच्या महोत्सवास सुरुवात झाली असून हा महोत्सव 2 मार्च 2022 पर्यंत साजरा होत आहे. यात दररोज रात्री 8 ते 11 या कालावधीत भागवत कथा वाचन सादर केले जात आहे. भगवंत आचार्य संत श्री राजाराम दास जी महाराज यांच्या मधुरवाणीत व त्यांच्या सानिध्यातील इतर संत-महात्मे यांच्या उपस्थितीत कथा पुरणाचा  कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमादरम्यान 23 फेब्रुवारी रोजी कलश पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला 26 फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमाची समाप्ती 2 मार्च रोजी पूर्ण होती कार्यक्रम सकाळी 9 ते 12 वाजता व महाप्रसाद दुपारी 11 वाजेपासून संपन्न होणार आहे त्याआधी 1 मार्च रोजी रात्री 12 ते 3 या वेळेत रुद्रभिषेक कार्यक्रम संपन्न होत आहे सदर कार्यक्रमास पावन संत परम पूज्य संत श्री भगवान दास जी महाराज, प्रविंद्रादास जी महाराज मेंद्राणा मध्य प्रदेश यांच्या आशीर्वादाने व यांच्या पावन सानिध्यात साजरा होत आहे. तरी सदर धार्मिक महोत्सवाच्या कथा प्रवचन व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री क्षत्रिय वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह मित्र मंडळ नांथे ते अजंदे व तांडे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने