*मेथी गावाच्या सरपंचपदी रेखा बागले बिनविरोध*




दोडाईचा (अख्तर शाह)
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे सरपंच पदी रेखा बागले बिनविरोध झाल्या अनेक महिन्यांपासून मेथी ग्रामपंचायत  चर्चेत होते माजी सरपंच रमाकांत बागले यांची तक्रार आरोपाखाली सदस्यांनी अविश्वास दाखल करण्यात आला होता मेथी ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून रमाकांत बागले हे पदावर विराजमान झाले होते गावात काही विकासकामांच्या माध्यमातून त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी तक्रार आरोप करण्यात आले व त्यात नऊ सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास मंजूर केला म्हणून त्यांचे सरपंचपद हे बात करण्यात आले परंतु सदर तक्रारी विषय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे  झालेला नसून पुढील सरपंच पदाची मेथी ग्रामपंचायतीची जागा एस. सी .राखीव असल्याने निवडून आलेले 11 सदस्यांमध्ये दोन जागा या ए .सी. वर्गाच्या होत्या त्यात रमाकांत बागले व त्यांच्या धर्मपत्नी सौ रेखा बागले हे वार्ड क्रमांक तीन मधून निवडून आल्या होत्या म्हणून रमाकांत बागले यांचे पद गेल्यामुळे एकमेव जागा ए.सी.ची रिक्त होती त्यावर निवडणूक अध्यासी अधिकारी  म्हणून श्री संजय भाऊराव जगताप यांनी दिनांक 25 रोजी मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 अन्वये नियम  11 मधील पोट निवडणूक 2,3,4 ची अंमलबजावणी करण्यात
 आली 
लेखी अजेंडा देण्यात आला तरीदेखील ते मिटींगला नऊ सदस्य गैरहजर होते त्या दिवसाची मिटिंग श्री जगताप यांनी तहकूब केली व उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा मीटिंग लावण्यात आली तरीदेखील मीटिंग च्या दुसऱ्या दिवशीही नऊ सदस्य गैरहजर होते व सरपंच पदासाठी एकमेव रिक्त जागेचा फार्म सौ रेखा बागले यांचा भरण्यात आला व त्यांना अनुमोदक म्हणून सदस्य सौ गुंताबाई गोकुळ माळी हे झाले त्यापुढे सर्व कामकाज श्री एस.बी. जगताप यांनी काम पाहिले सरपंच पदाचा एकमेव काम असल्याने सौ रेखा रमाकांत बागले यांना सरपंच म्हणून घोषित केले 
यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ आणि रेखाबाई बागले समर्थक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते त्यानंतर सौ रेखाबाई बागले यांचा सत्कार श्री रमाकांत बागले यांनी केला असून त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी आनंदाचे वातावरण निर्माण केले व त्यांच्या मुलाखतीतून अखेर सत्याचा विजय झाला हे उदगार काढत माझ्या पतीचे राहिले अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करेल व गावाचा विकास आत बदल केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले.
आणि सर्व मेथी ग्रामस्थांच्या आभार मानले .यावेळी उपस्थित
शिंदखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा रमाकांत बागले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय जगताप यांनी काम पाहिले. निवडीनंतर रेखा बागले यांचा ग्रामपंचायत सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.पं.सदस्य गुंताबाई माळी, भिला गिरासे, माजी उपसरपंच दगा आगळे, हिरामण बच्छाव, बापू माळचे, लोटन टेलर, छोटू माळी, विनोद माळचे, पदमसिंग गिरासे, नवलसिंग गिरासे, दगडू धोबी, गोपीचंद आगळे, रिंकू गोसावी आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने