दोडाईचा भारतीय जनता पक्षाच्या केंद्र शासनाचा व केंद्रिय भाजप सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोकाधिष्ठित व लोककल्याणकारी शासन अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजप पक्षाचा व त्या पक्षाच्या सत्तापिपासु नेत्यांचा त्रिवार निषेध असो
१ नोव्हेंबर २०१९ पासून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अ.भा. काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय व लोककल्याणकारी शासन सत्तारूढ आहे. भारताचे लोकनेते खा. खरद पवार यांचे असामान्य सर्वगामी नेतृत्व लाभलेले महाविकास आघाडीचे शासन स्थिर व लोकमान्य आहे. देशाच्या नेत्या मा. सोनियाजी गांधी व शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे भक्कम व ध्येयवादी तसेच लोकशाही नेतृत्व या शासनाचा आधार आहे. पुढील विधानसभा निवडणूकीनंतरही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच शासन असणार आहे हे स्वयंस्पष्ट आहे.
२ त्यामुळे ऑक्टोवर / नोव्हेंबर २०१९ मध्ये ज्यांच्या हातून सत्ता निसटली ते भाजपचे सर्व नेते विशेषतः सत्तापिपासूचे प्रमुख मा. देवेंद्र फडणवीस तर फार निराश व हताश तसेच सैरभैर झाले आहेत.
म्हणून गेलेली राज्यसत्ता भल्याबुऱ्या मार्गाने मिळविण्यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे केंद्रिय भाजप सत्तेचा पूर्ण दुरूपयोग चालवला आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी इ.डी. / सी.बी.आय. / इनकमटॅक्स इत्यादि केंद्रिय संस्थाच्या दुरूपयोगातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कितीतरी मातब्बर नेते भाजपच्या कळपात ओढले होते..
3 आजही हातून निसटलेली सत्ता पुन्हा भल्याबुऱ्या मार्गाने मिळविण्यासाठी त्यांनी केंद्रशासनाच्या अधिकारातील या सर्व संस्थांचा विशेषतः इ.डी. व सी.बी.आय. यांचा दुरूपयोग करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अ.भा. काँग्रेसच्या अनेक वरीष्ठ नेत्यांवर व काही मंत्रीमहोदयांवर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये पाठवून सर्वत्र धाक बसविण्याचा प्रयत्न
चालविला आहे. या माध्यमातून महाविकास आघाडीची राजसत्ता मोडकळीस आणून मागच्या दाराने पुन्हा महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्याचा घाट फडणवीस व कंपूने घातला आहे. म्हणून ना. नवाब मलीक यांच्याप्रती आमचा, मैत्रभाव व आत्मीयता आणि आपुलकी दर्शविण्यासाठी व त्यांना राजकीय / सामाजिक व पारिवारीक पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते येथे केंद्रशासनाच्या दादागिरीचा तसेच पाताळयंत्री सत्तालोलुप फडणवीसांच्या भाजप कंपूचा तीव्र निषेध करण्याकरीता येथे एकत्र आले आहोत.
ना. नवाब मलीक यांचेवर केंद्रशासन व महाराष्ट्र भाजप यांनी हे जे भयंकर खोट्या आरोपाचे व त्यांना वृथा जेलमध्ये ठेवण्याचे जे राजकीय कारस्थान रचले आहे. त्याकरीता त्यांचा आम्ही येथे तीव्र निषेध करीत आहोत. आमची ही भावना (१) महाराष्ट्र शासनाला व (२) केंद्र शासनाला कळविण्यात यावी अशी विनंती आहे.
यावेळी उपस्थित
माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख नानाभाऊ मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, शिंदखेडा नगर पंचायतचे नगरसेवक सुनील चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे शामकांत पाटील, राहुल माणिक, युवा सेना जिल्हा प्रमुख आकाश कोळी शैलेश सोनार, सागर पवार, ऐड.एकनाथ भावसार, विठ्ठलसिंग गिरासे,समाजवादी पक्षाचे उस्मान अशरफी, अमित पाटील,रहिम पिंजारी, दयाराम कुवर.दिपक दादा गिरासे।
दादाभाई कापुरे, महेंद्र पाटील भुपेंद्र धनगर, दिलीप पाटील, गिरधारी रामराख्या,नंदू सोनवणे, एकलव्य भिल जनसेवा संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिन सोनवणे, करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख,नाजीम शेख, कय्युम पठाण, रहिम पिंजारी, प्रदीप चैनानी, बिलाल बागवान, रईस बागवान अजिज बागवान गफ्फार बागवान, वसंत कोळी, मुन्ना खाटिक, मोना सज्जाऊद्दीन,आबीद शेख,शिवा परदेशी, अशोक सोनवणे,आबा चित्ते,अनिताताई देशमुख, शिंदखेडा विधानसभा क्षेत्राचे महीला अध्यक्ष पूजा खडसे,जोगशेलू सरपंच ज्योती देसले, मीराबाई ठाकूर लक्ष्मी ठाकूर आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष दयाराम कुवर यांनी केले.माजीमंत्री डॉ हेमंतराव देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, ऐड एकनाथ भावसार,अमित पाटील,दिपक गिरासे, यांनी मनोगत व्यक्त केले.
Tags
news
