शिरपूर : येथील राजू व्ही. महाले यांना अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय गुरू रविदास गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंती निमित्त दि. १६ फेब्रुवारी रोजी कात्रज, पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरूपात देण्यात आला.
गुरू रविदास विचार प्रचार-प्रसार व सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, पंढरीनाथ अहिरे, किरण शेवाळे, अनिल जाधव, संजय मोरे, संजय वाघ, महेंद्र अहिरे, छोटू सोनवणे, बापू सोनवणे, अशोक शिरसाळे, वसंत महाले, रवींद्र पवार, दिलीप गवळे, ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र गवळे, चंद्रकांत सोनवणे, संतोष मोरे, सैदाने सर, गोपीचंद अहिरे, प्रमोद भामरे यांनी अभिनंदन के
Tags
news
