शिरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शिरपूर, जि. धुळे च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .ज.पा. च्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर ई.डी. माध्यमातून च्या सुडबुद्धीने कार्यवाही करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते मा. ना. नवाब मलिक साहेब यांच्यावर राजकीय सुडभावनेतून ई.डी. या सरकारी यंत्रणेची कार्यवाही केंद्रातील भा.ज.पा., मोदी सरकारने केलेली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर यापूर्वी सुद्धा केंद्र सरकारच्या नियंत्रणा खालील ई.डी. या सरकारी यंत्रणेच्या कार्यवाह्या सुरु आहेत. यापूर्वीच्या सरकारांनी कधी नव्हे एवढा वापर आज ई. डी. या सरकारी यंत्रणेचा गैरवापर केंद्र सरकार करीत आहे. आज संपूर्ण देशभरात अघोषित आणिबाणी सारखी परिस्थिती निर्माण करण्याचे कटकारस्थान केंद्र सरकार करित भा.ज.पा स्वतःची राजकीय पोळी शेकत आहे.
खान्देशचे नेते मा. श्री. नाथाभाऊ एकनाथराव खडसे साहेब व खडसे परिवारावर याच राजकीय सुड भावनेतून झालेल्या कार्यवाही मुळे खान्देशातील विकासाला ब्रेक लागला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते व मंत्रीवर कार्यवाही मुळे महाराष्ट्रात जनआक्रोष निर्माण झाला आहे. देशात बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा बट्याबोळ करुन आर्थिक अडचणीचा सामना जनतेला करावा लागत आहे. धर्माच्या नावावर भारतीय जनता पार्टी राजकारण करित असल्याने देशभरातून तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत. ई.डी. सारख्या सरकारी यंत्रणेला केंद्र सरकारने हाताचे बाहुले बनवून देशातील राजकीय, उद्योग, सिनेसृष्टीतील प्रमुख मंडळींना टार्गेट करुन ई. डी. ची कार्यवाही केली जात आहे. देशद्रोही कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा आजपर्यंत केंद्रसरकारने कुठलाही तपास न करता शोध घेतलेला नाही. देशभरातील भाजपाचा विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना टारगेट करुन इंडीकार्यवाह्या सुरु आहेत. महाराष्ट्रातील भाजपाची महाभरती अभियांनातील भ्रष्टाचारी, आयात, निर्यात केलेल्या मुंबई पासून शिरपूर पर्यंतच्या नेत्यांवर ईडीची कार्यवाही केंद्र सरकार कधी करणार? महाविकास आघाडीतील राज्याचे कॅबिनेट मंत्र्यांना जर अशी सुड बुध्दीची वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकाचे जगणे कठीण झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करुन ई.डी. या सरकारी यंत्रणेचा सुड बुध्दीने उपयोग करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शिरपूर जि. धुळे जाहीर निषेध करीत आहे. वरील जनभावनांचा विचार करुन महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर भा.ज.पा.च्या केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यवाहीचे कटकारस्थान त्वरीत बंद करणे बाबत कार्यवाही व्हावी अशी विनंती केली आहे. सदर निवेदनावर
शिरीष पाटीलतालुका अध्यक्ष ,डॉ. मनोज महाजन,शिरपूर शहराध्यक्ष,मनोहर पाटील
काँग्रेस अध्यक्ष,,रमेश आबा करंकाल,अशपाक सैय्यद, ईश्वर बोरसे, भरत सिंह राजपूत ,अडवोकेट गोपाल राजपूत,हेमराज राजपुत, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Tags
news
