होळनांथे परीसर डॉक्टर्स व केमिस्ट्स् असोसिएशन अध्यक्षपदी डॉ.योगेंद्र पाटील उपाध्यक्ष अरुण पाटील बभळाज / प्रतिनिधी






शिरपूर तालुक्यातील होळनांथे व परीसरात वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर्स व केमिस्ट्स् या संघटनेची स्थापना १९८४ साली  झाली.तदनंतर असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय शिबिरे,शैक्षणिक क्षेत्रात मुलांसाठी स्पर्धा,चर्चासत्रे असे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.सर्वच रोगांवरील रोगनिदान व चिकित्सा शिबीरांचे आयोजन नियमित केले जात आहे.सदर शिबीरांना धुळे जळगाव चोपडा शिरपूर येथील तज्ञ डॉक्टरांचे नियमित सहकार्य लाभत आले आहे.आरोग्य शिबिर व शैक्षणिक चर्चासत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करतांना योग्य ते मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील डॉक्टरांना मिळत असते.आजवर सुमारे १५० च्यावर डॉक्टर्स व केमिस्ट्स् सदस्यांनी असोसिएशन चे सदस्यत्व स्विकारलेले असून थाळनेर भोरखेडा पासून तर वेळोदे घोडगाव परीसरातील डॉक्टर्स व केमिस्ट्स् सदस्य आहेत.
     कोरोना काळात सुद्धा महत्वपूर्ण कामगिरी होळनांथे परीसरातील डॉक्टरांनी बजावलेली आहे.शिरपूर व चोपडा हे होळनांथे गावापासून २५-३० किलोमीटर अंतरावर असल्याने प्रामुख्याने होळनांथे गावातील उपचारांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागले अशा वेळेस तज्ञ डॉक्टरांनी अॉनलाईन दिलेल्या सल्ल्याचा फायदा झाला.व रुग्णसेवा योग्य प्रकारे करता आली.सध्या सर्वच सदस्य लसीकरणचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.आतापर्यंत असोसिएशनच्या ७ सदस्यांना शासनाने सीएचओ पदावर नियुक्त केलेले आहे.
या पुढेही ग्रामीण वैद्यकीय सेवेत जास्तीतजास्त कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवून सन २०२२ साठी नविन पदाधिकारींची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ.योगेंद्र पाटील जापोरेकर, उपाध्यक्षपदी अरूण पाटील  केमिस्ट्स् बभळाज,व
सेक्रेटरीपदी डॉ.राहुल आर.पाटील मोहिदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने