युवकांनी आत्मनिर्भर भारत अभियान संगठन योजनांचा लाभ घ्यावा - राहुल रंधे





  शिरपूर (वार्ताहर) युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केंद्र सरकारच्या खुप योजना आहेत.शिक्षण,रोजगार,व्यवसाय,उद्योगासाठी कर्जपुरवठा केला जाईल,नियमानुसार वित्त पुरवठा केला जातो.अतिशय सोप्या पद्धतीने लवकर मदत मिळते.सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे अडचण येत नाही.म्हणून ग्रामीण भागातील युवकांनी यातील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा,प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी बोराडी येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या माध्यमातून युवक-युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसाय, उद्योगासाठी मार्गदर्शन,अर्थपुरवठा करण्यासाठी बेरोजगार युवक व युवतींच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
        यावेळी बोराडी परिसरातील 312 युवक-युवती उपस्थित होते. तसेच रोजगार संबधीत विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बोराडी येथील शाहू महाराज हाॅलमध्ये दि.23 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा,प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे होते तर,प्रमुख पाहुणे म्हणून संगठनचे उत्तर महाराष्ट्र महासचिव राजेश मारवाडी, धुळे जिल्हा नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल,सहाय्यक अधिकारी ललित पाटील,शिरपूर तालुका समन्वयक गणेश चौधरी,प्राचार्य डाॅ.डी.बी.पाटील, रविंद्र शिंदे,विठ्ठल जगताप,सुकदेव मालचे,ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील,जिजाबराव निकम,चंद्रसिंग पावरा,हरी पावरा,भरत पावरा,नवल पाटील,वासुदेव सत्तेसा इ.
उपस्थित होते.
          यात आत्मनिर्भर होण्यासाठी रोजगार संबधीत विविध शासकीय योजनांची माहीती नेहरू युवा केंद्र व आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली गेली. 
       प्रास्ताविकात राजेश मारवाडी यांनी सांगितले की,कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत.म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा,स्वतःच्या पायावर उभे राहुन देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून आत्मनिर्भर भारत अभियान संगठन योजनेंतर्गत कृषी,व इतर व्यवसायसाठी अर्थसहाय्य मिळु शकते,तसेच बचतगटाच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करता येईल.
        अशोक मेघवाल यांनी सांगितले की,नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवकांसाठी कार्य करण्यात येत आहे.प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या माध्यमातून युवक-युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसाय,उद्योगासाठी मार्गदर्शन,अर्थपुरवठा केला जाईल,
       या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रसिंग राजपुत,गजु पाटील,प्रकाश वाल्हे,अंबादास सगरे,गणेश भामरे यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन चंद्रकांत बडगुजर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने