ग्राम स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा महाराज थोर समाजसेवक




✍️पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे

ठाणे - थोर समाजसेवक व ग्राम स्वच्छतेचे पुरस्कर्ते संत गाडगेबाबा महाराज यांना जयंती दिनानिमित्त नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली.ना.शिंदेसाहेब हे गाडगेबाबा यांच्या स्मरणार्थ आपले विचार व्यक्त करताना म्हणतात," गाडगेबाबांनी जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन लोकांच्या मनात स्वच्छतेची महती बिंबवली. लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविताना तत्कालिन समाजातील अंधश्रद्धेची मलिनता साफ करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले.त्याबरोबरच त्यांनी अनिष्ठ रूढी,अघोरी विद्या व व्यसनाधिनता या विरुद्धदेखील प्रखर लढा दिला.
गाडगेबाबांनी स्वतः हातात खराटा घेऊन रस्ते झाडत,लोकांना स्वच्छतेचे महत्व व उपयुक्तता अवगत केली. *गाडगेबाबा हे तुकोबाचे अवतार आहेत,असे गौरवोद्गार आचार्य अत्रे यांनी काढले*.एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी पशू बळी देणं,या अनिष्ट प्रथेविरुद्ध लढा पुकारून लोकांना त्यापासून परावृत्त करण्याचे महान कार्य गाडगेबाबांनी केलं.भूतदयेचे महत्व जनसामान्यांना पटवून दिलं.
गाडगेबाबांचे पाईक असलेल्या राज्य सरकारने त्यांच्या स्वच्छतेच्या मार्गाचा अवलंब करून राज्यात निर्मल ग्राम योजना,ग्राम व शहर स्वच्छता मोहीम राबविली.इतकेच नव्हे तर,*स्वच्छ महाराष्ट्र अभियान* राबवून देशात राज्याने स्वच्छता अभियानात प्रथम स्थान पटकविले,ही महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे.
ठाणे शहर देखील स्वच्छता मोहिमेत राज्यात सदैव अव्वल राहिले आहे,याचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो,असे मत शिंदे साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केलं.याप्रसंगी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे अन् महापौर श्री.नरेश म्हस्के यांनीही जयंती दिनानिमित्त संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन केलं.
चला तर,गाडगेबाबांच्या विचारधारेचा अवलंब करून शिवरायांच्या महाराष्ट्राला स्वच्छता अभियानात सर्वोच्च स्थान मिळवून देण्यास आपण सर्वधर्मीय नागरिक एकदिलाने कटिबद्ध होऊया! जय महाराष्ट्र 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने