शिरपूर : तालुक्यातील भोरखेडा येथे आर. सी. पटेल विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती व पोलीस उपनिरीक्षक राजपूत दाम्पत्याचा सत्कार व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.विद्यालयाचे वार्षिक बक्षिस वितरण व संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने माजी विद्यार्थी निलेश आधारसिंग राजपूत व सौ. मोनिया निलेश राजपूत हे पी.एस.आय. दाम्पत्य प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य आर. एफ. शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. या मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत व सौ. मोनिया राजपूत यांचा सत्कार प्राचार्य आर. एफ. शिरसाठ व शिक्षिका सौ. मीना पटेल यांनी केला.सत्काराला उत्तर देताना पीएसआय सौ. मोनिया राजपूत म्हणाल्या, विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चय करून आईवडिलांचा विश्वास कायम ठेवून मेहनतीने आपले यश प्राप्त करू शकतो तसेच संत गाडगे महाराज यांची स्वच्छता विषयीची शिकवण आज ही महत्त्वाची आहे, स्वच्छ वातावरण आपले मानसिक व शारीरिक क्षमता विकसित करते असे विचार व्यक्त केले.पीएसआय निलेश राजपूत यांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्व प्रकारची मदत व 12 वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके मोफत देण्याचे जाहीर केले विद्यार्थ्यांनी शिस्त व नियमित व्यायाम ,आणि अभ्यास करणे महत्त्वाचे आहे प्रत्येक विषयातील संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने दिलेल्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले. ₹ प्रास्ताविक पर्यवेक्षक पी. व्ही. पाटील, सूत्रसंचालन एन. वाय. बोरसे व आभार एस. आर. देसले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. दिपाली निकम, एन. डी. चव्हाण, एस. एम. पाटील, पी. टी. चौधरी, व्ही. एस. ईशी, डी. आर. राजपूत, व्ही. डी. पाटील, एस. जे. पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.
Tags
news