शिरपूर : श्री व्यंकटेश बालाजी संस्थान, वरचे गाव शिरपूर चे सर्व विश्वस्त व कार्यकारणीचे सदस्य तसेच वरचे गाव शिरपूर येथील बंधू आणि भगिनी यांच्या वतीने शिरपूर वरवाडे नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियान अंतर्गत ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड झाल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल यांचा जाहीर सत्कार व स्वच्छता सुसंवाद कार्यक्रम शहरातील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल मध्ये संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावर हवामान व पर्यावरण बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची प्रभावी अंमलबजावणी करणे सुरु असून शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मंगळवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता पांडू बापू माळी शाळेच्या पटांगणावर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बालाजी मंदिर सरचिटणीस श्यामकांत ईशी यांनी स्वच्छता अभियाना बाबत तसेच श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या कार्याबद्दल विवेचन केले तसेच नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल व राजेंद्र अग्रवाल यांच्या सत्काराच्या व सुसंवाद कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल देखील सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन व स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन, कापडी पिशवी सर्वांनी वापरावी याबाबत स्वीय सहाय्यक पौर्णिमा पाठक यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, मुख्याधिकारी तुषार नेरकर, शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल, श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल , उपाध्यक्ष उत्तमराव माळी, कोषाध्यक्ष ईश्वरलाल शिरसाठ, सहचिटणीस श्यामकांत ईशी, विजयसिंग गिरासे, शिरपूर मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, बालाजी भक्त तसेच संगिता देवरे, नजेराबी शेख, रेखा सोनार, छाया ईशी, धुळे व नंदुरबार जिल्हा बँक संचालिका सीमा रंधे, मुमताजबी कुरेशी, भुरा राजपूत, राजेंद्र पाटील, राजू शेख, रजाक कुरेशी, विजयसिंग गिरासे, हर्षल गिरासे, चंद्रकांत सोनवणे, सोनू सोनार, नितीन गिरासे, संतोष माळी, पांडुरंग माळी, भुपेश अग्रवाल, दुर्गेश चौधरी, राजेंद्र चौधरी, विजय तिवारी, पां. बा. माळी मुख्याध्यापक के. पी. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक कानडे, पर्यवेक्षकसुभाष गवळी, अधिक्षक जितू जाधव, प्रेमसिंग राजपूत, बालाजी महिला सेवा समिती पदाधिकारी, दिपाली साळुंखे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags
news
