शहादा (प्रतिनिधी) :- मध्यप्रदेश राज्यातुन महाराष्ट्र (शहादा- नंदुरबार) मार्गे गुजरात राज्यात गांजा विक्री साठी जाणाऱ्या तीन जणांना बोलेरो गाडीसह शहादा पोलिसांनी अटक केली आहे . त्या महेंद्रा बोलेरो गाडीतून ४५ हजार ७३१ रुपये किमतीचा ६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या व्यक्तींकडून ७ लाख किमतीची महेंद्रा बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे . मध्यप्रदेश , गुजरात , महाराष्ट्र तीन राज्यांच्या सीमेतुन प्रवास करून गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांना चकमा देण्यासाठी या बोलेरो गाडीस दोन नंबर प्लेट बसविण्यात आले होते. ते दोन नंबर प्लेट वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे . आरोपी राजेश सपन विश्वास , वर्जन नारायण पावरा , राजेश भटुसिंग पावरा राहणार नांदियाबड तालुका पानसेमल जिल्हा बडवानी मध्यप्रदेश राज्यातून असून ४५ हजार ७३१ रुपये किमतीच्या गांजा व ७ लाख रुपये किंमतीची महेंद्रा कंपनीची बोलेरो गाडी असा एकूण ७ लाख ४५ हजार ७३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याबाबत पुढील तपास शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे करीत आहेत.
Tags
news
