■■ प्रकाशा येथे महाशिवरात्री निमित्त होणारी गर्दीवर नियंत्रणाबाबत चर्चा




शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील प्रकाशा हे स्थान  दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे . दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते . महाशिवरात्रीला प्रकाशा येथील केदारेश्वर , पुष्पदंतेश्वर , काशीविश्वेश्वर , संगमेश्वर , गौतमेश्वर , चिंतामणी महादेव यांसह इतर महादेवाच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात . भाविक दर्शन घेण्याआधी तापी नदीत स्नान करतात काही भाविक नवसही फेडतात केदारेश्वर मंदिरासमोर पाचशे , हजार पाच हजार , सात हजार वातींची ज्योत लावतात व भाविक आपले नवस फेडतात . गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्रीला पूजाविधी झाला नाही . यंदा शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी दिल्यामुळे भाविक दर्शनाला मोठ्या येतील . त्यामुळे गरजेचे आहे प्रमाणावर नियोजन होणे महाशिवरात्रीला ज्यांनी मान्यता मानलेली असते , ते भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतात . महाशिवरात्रीनिमित्त येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन आवश्यक आहे यासाठी केदारेश्वर मंदिर संस्थानच्या अध्यक्षांनी शहादा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले होते . त्या पार्श्वभूमीवर येथील सद्गुरू धर्मशाळेत केदारेश्वर मंदिर संस्थान व सद्गुरू धर्मशाळा संस्थान सदस्यांची बैठक पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी घेतली .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने