दोडाईचा परिवहन मंडळाच्या बस स्थानकात मराठी दिन मोठ्या उत्साहाने साजरा* दोडाईचा (अख्तर शाह)



दोडाईचा परीवहन मंडळाच्या बस स्थानकात 21 जानेवारी मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 
 कवी, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रसिद्ध लेखक कुसुमाग्रज शिरवाडकर उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सबंध महाराष्ट्रात मराठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो .याच पार्श्वभूमीवर दोंडाईचे आगाराच्या वतीने बसस्थानकात सदर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा परिवहन मंडळाच्या विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष  पत्रकार जितेंद्र सिंह गिरासे होते. यावेळी  धुळे येथील परिवहन विभागीय वाहतूक अधीक्षक अधिकारी श्री पी डी देवरे साहेब, दोंडाईचा आगार व्यवस्थापक सौ अनुराधा चौरे मॅडम, विश्वासू प्रवासी संघटनेचे सदस्य हुसेनभाई विरदेलवाला, सदाशिव भलकार ,मनोज पारख ,दोंडाईचा परिवहन मंडळाचे वाहक निरीक्षक नितीन पाटील, लिपिक एल बी कोळी, आदीसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गिरासे म्हणाले मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी यापुढे सर्वांनी मराठीतून संभाषण करणे काळाची गरज आहे  महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी मराठा बाणा अंगीकारला पाहिजे. कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेतून, साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केलेले प्रयत्न मोलाचे योगदान आहे. असे ते म्हणाले याप्रसंगी सदाशिव भलत्कार आगार प्रमुख अनुराधा चौरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिवहन मंडळाचे एलबी कोळी यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने