रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मराठी भाषा गौरव दिन' संपन्न* दोडाईचा (अख्तर शाह)




दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी  इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणारे व मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेणारे वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन  म्हणून त्यांचा  जन्मदिवस ' मराठी भाषा गौरव दिन ' म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री एम. पी.पवार उपस्थित होते . 
       यादिवशी शाळेत संविधान प्रास्ताविकेचे मराठीतून वाचन तसेच हस्ताक्षर लेखन, निबंधलेखन, वक्तृत्व, स्वरचित कवितालेखन, भित्तीपत्रके बनविणे, ऑनलाईन प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांत विदयार्थ्यांनी सहभाग घेत मराठीचे महत्व पटवून दिले.       
    कु.भूमिका सोनवणे व   कु.आकांक्षा राजपूत यांनी आपल्या भाषणातून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज यांच्या सांस्कृतिक व मराठी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा इतिहास विदयार्थ्यांसमोर मांडला तर सौ.रुपाली निकम यांनी संविधान प्रास्ताविकेचे मराठीतून वाचन केले.
   हस्ताक्षर लेखन स्पर्धेत आर्या चोंढाळकर प्रथम, हर्ष सूर्यवंशी द्वितीय, वेदांत पाटील व उत्कर्ष माळी तृतीय. निबंधलेखन स्पर्धेच्या 5 वी ते 7 वीच्या गटात वैभव पाटील प्रथम, आकांक्षा राजपूत द्वितीय, लक्षवेदिका पाटील व अर्णवी पाटील तृतीय. 8 वी व 9 वीच्या गटात स्वरा नगरदेवळेकर प्रथम,धारा जैन द्वितीय, भूमिका सोनवणे तृतीय, स्वरचित कवितालेखन स्पर्धेत समरदिप पवार प्रथम, प्राची गिरासे द्वितीय,श्रुती सूर्यवंशी तृतीय, भित्तीपत्रक स्पर्धेत दिव्यानी गुरव प्रथम, खुशी माळी द्वितीय, ओम शिंपी तृतीय. वक्तृत्व स्पर्धेत भूमिका सोनवणे प्रथम,स्वरा नगरदेवळेकर व  सिद्धी गिरासे द्वितीय तर निखील सोनवणे तृतीय. ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विरती जैन व प्राची जाधव प्रथम, प्रथमेश सोनजे द्वितीय तर मेघवर्धन याने तृतीय क्रमांक मिळवला.
         प्राचार्य श्री एम. पी. पवार यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी राज्यभाषा असून तिचा स्वाभिमान बाळगावा. मातृभाषेवर प्रभुत्व मिळवलेला व्यक्ती इतर भाषांचे ज्ञान सहज आत्मसात करु शकतो. मातृभाषेबरोबर राष्ट्रभाषा हिंदी व आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीचेही ज्ञान आवश्यक असल्याचे मत मांडले.
      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री डी. एम. पाटील, सौ.उर्मिला पाटील श्री दिनेश पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सौ. शितल पाटील यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने