*'मन कि बात' कार्यक्रमाला बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनात शिरपूरात उस्फूर्त प्रतिसाद*



 शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक प्रसारित होणाऱ्या मन कि बात उपक्रमाला शिरपूर शहर व तालुक्यातुन उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे नियोजन पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिन्याभरातील विशेष कार्य सरकारच्या योजना तसेच अनेक प्रेरणादायी विषयाबाबत जनतेशी संवाद साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद सर्वपर्यंत पोहचावा यासाठी भारतीय जनता पार्टी शिरपूर तर्फे या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, मन कि बात तालुका संयोजक प्रमोद मराठे, सह संयोजक अजिंक्य शिरसाठ, शहर संयोजक रविंद्र भोई, सहसंयोजक अनिल बोरसे आदिंनी परिश्रम घेतले. दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेला मन की बात या कार्यक्रमाचा ८७ वा भाग विविध चॅनल्सवर प्रसारीत झाला होता. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी यांनी शहरातील बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम बघितला. कार्यक्रम बघण्यसाठी यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी यांचा सह तालुकाध्यक्ष किशोर माळी, खंडेराव बाबा संस्थान उपाध्यक्ष संजय आसापुरे, शिरपूर भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, मन की बात कार्यक्रम तालुका सह संयोजक अजिंक्य शिरसाठ, शहर संयोजक रविंद्र भोई, शहर सह संयोजक अनिल बोरसे, प्रसाद चौधरी, स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील आदिंसह शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने