अक्कलकुवा शहरातील गेल्या 5-6 दिवसा पासून ग्रामपंचायत तर्फे गावाच्या प्रत्येक घरात पाणी पुरवठा ठप्प आहे लोकांचे घरात पाणी नाही येत आहे त्यामुळे अक्कलकुवा गावाचे लोक फार त्रस्त आहे त्यासंदर्भात आज अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी उपसभापती भाऊ राणा यांनी अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन म्हस्के साहेब व अक्कलकुव्याचे गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली व त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे व गावातील प्रत्येक घरात पाणी सुरू करण्याचे आश्वासन भाऊ राणा यांना दिले तसेच अक्कलकुवा ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांना बोलवून सांगितले की उद्यापासून गावात पाणी पुरवठा सुरू करा व तुमचे व सफाई कर्मचारी यांचे जे पगार बाकी आहे त्याची पण आम्ही व्यवस्था करतो असे त्यांना आश्वासन दिले त्यावेळी भाऊ राणा यांच्या सोबत अक्कलकुवा ग्रामपंचायतचे माजी सदस्य मोहम्मद हुसेन दादा मकराणी हे देखील उपस्थित होते.
Tags
news
