तालुक्यातील ग्राम तांदुळवाडी येथील पस्तीस वर्षीय विवाहितने छताला लावलेल्या लाकडी बांबूला ला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा दरम्यान घडली . याबाबत सविस्तर वृत्त असे की तांदूळवाडी येथील सौ कविता जयंत खाचणे तय ३५ यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या बाबतची माहिती पोलीस पाटील बाळकृष्ण जनार्दन खाचणे वय ६२ रा . तांदुळवाडी यांनी दसरखेड पोलीस स्टेशनला दिली असून फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास बिट जमादार टेकाडे करीत आहे .
Tags
news
