एस.व्ही.के.एम. मुंबई संचालित एन.एम.आय.एम.एस. व्हर्च्युअल करिअर फेअर ‘मास्टरमाइंड' चे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजन

 



शिरपूर : एस.व्ही.के.एम. मुंबई संचालित एन.एम.आय.एम.एस. व्हर्च्युअल करिअर फेअर ‘मास्टरमाइंड' चे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
लहान गावे व मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी आणि नवीन जागतिक व्यवस्थेसाठी सज्ज होण्यास मदत करणे हे या व्हर्च्युअल करिअर फेअर ‘मास्टरमाइंड' कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
एस.व्ही.के.एम. मुंबई संचालित नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एन. एम. आय. एम. एस.) मार्फत 25 आणि 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत भारतातील सर्वात मोठा आभासी करिअर मेळावा 'मास्टरमाइंड 2022' आयोजित करण्यात आला असून 16 शाळा व एनएमआयएमएस कॅम्पस मधील 8 विषयांचे तज्ज्ञ अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन करतील व एनएमआयएमएस द्वारे देण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबद्दल माहिती देणार आहेत.
एनएमआयएमएस कडे उपलब्ध असलेल्या सर्व प्रोग्राम्सचे तपशिल, कॅम्पस टूर्स, माहितीचे वेबिनार व ब्रॉशर्स डाउनलोड करण्यासह विद्यार्थ्यांना भरपूर माहिती ऑनलाईन प्रकारे दिली जाईल व हा वेगळा अनुभव घेता येणार असून उपयुक्त कार्यक्रम आखण्यात आला आहे.
सहभागी विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयाच्या व्हर्च्युअल रूम्सला भेट देऊ शकतात, त्यांच्या भविष्याविषयी चर्चा करून भविष्याला आकार देण्याचा निर्णय घेऊ शकतात. कॉर्पोरेट जगात एनएमआयएमएस मधील जे माजी विद्यार्थी विविध ठिकाणी उत्तम पदांवर कार्यरत आहेत, त्यांची झलक दाखविण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण वॉल ऑफ फेमसुद्धा सादर केली जाईल.  
इंजिनिअरिंग, सायन्सेस, फार्मसी, इंटेरिअर एनव्हायरनमेंट आणि डिझाईन, स्थापत्य, कॉमर्स, व्यवस्थापन, ब्रँडिंग व एडव्हर्टायझिंग, अर्थशास्त्र, लिबरल आर्टस, संगीत, आदर आतिथ्य, कायदा व डिझाईन (ह्युमनायझिंग टेक्नॉलॉजी) अशा विविध स्ट्रीम्सबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळेल.
विद्यार्थी इथे नोंदणी करू शकतात-  https://mastermind.nmims.edu/  या लिंक वर लवकर नोंदणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रश्न विषय तज्ज्ञांना विचारता येऊ शकतील व आवश्यक ती माहिती मिळवता येऊ शकेल.
सीबीएसई, राज्य महामंडळ, आय.बी., डिप्लोमा व केंब्रिज बोर्डच्या शाळांमधील समुपदेशक व मुख्याध्यापक ह्यांनाही अद्ययावत ट्रेंडसबद्दल माहिती घेण्यासाठी 'मास्टरमाइंड 2022' अतिशय उत्तम संधी आहे. नवीन अर्थव्यवस्थेमध्ये असे कौशल्य सेट आवश्यक असतात जे उद्या कामी येऊ शकतील. विद्यार्थ्यांना ह्या फेअरमध्ये नवीन काळातील अध्ययन पद्धतींची माहितीसुद्धा दिली जाईल. 
एसव्हीकेएम च्या एन. एम. आय. एम. एस. युनिव्हर्सिटी बद्दल : 

1981 मध्ये स्थापन झालेली एनएमआयएमएस ही आज जागतिक पातळीवर नामांकित युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. 8 कॅम्पस द्वारे अनेक शाखांमधील शिक्षण येथे दिले जाते. इथे एकूण 17 स्पेशलाईज्ड स्कूल्स आहेत, 17 हजार पेक्षा जास्त पूर्ण वेळ विद्यार्थी व सुमारे 750 पूर्ण वेळ फॅकल्टी सदस्य (अधिकारी व कर्मचारी) आहेत. 10 फॅकल्टी सदस्यांना फुलब्राईट स्कॉलरशिप आणि पोस्ट डॉक्टोरल संशोधनासाठी ह्युमबोल्ड इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळाली आहे. श्री विले पार्ले केळवणी मंडळ (एस.व्ही.के.एम.) ने ह्या प्रतिष्ठित विद्यापीठाची पायाभरणी केली आहे व संस्थेचे उद्दिष्ट देशातील व्यवस्थापन संस्थांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण शिक्षणाच्या संशोधनावर आधारित दृष्टीकोनासाठी ही युनिव्हर्सिटी ओळखली जाते. एम.एच.आर.डी., यु.जी.सी. च्या एस.व्ही.के.एम. च्या एन.एम.आय.एम.एस. ला 2018 मधील ग्रेडेड ऑटोनॉमी रेग्युलेशनद्वारे प्रकार- I डीम्ड युनिव्हर्सिटी दर्जा दिला आहे आणि एनएमआयएमएस मुंबई कॅम्पस ला सीजीपीए 3.59 सह नॅकने मान्यता दिलेली आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने