पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकरवस्ती येथील विद्यार्थ्यांनी इंदापूर येथील राहुल चित्रपटगृहात जाऊन पावनखिंड या चित्रपटाचा आनंद लुटला. पारेकरवस्ती येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोडके सर व सहशिक्षिका सविता पवार मॅडम यांनी मुलांना महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहासाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा चित्रपट दाखवण्याचे ठरवले.यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय नागनाथ पारेकर व सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.श्री संतोष घोडके सर यांच्यावतीने सर्व मुलांना अल्पोपहार देण्यात आला. मुलांना चित्रपटगृहापर्यंत सोडणे व नंतर शाळेत पोहोच करणे याची व्यवस्था श्री. रघुनाथ महादेव पारेकर यांनी केली.चित्रपट पाहिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालकांनीही ही संधी मुलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.
Tags
news
