खडकेश्वर गणपती मंदिर आंबेवडगाव ता. पाचोरा, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. किसनभाऊ राठोड यांच्या आशीर्वादाने तसेच विलास भाऊ उपाध्यक्ष, पि. टी. भाऊ, मोहन भाऊ, जितेंद्र महाजन यांचे आशीर्वाद घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हा अध्यक्ष मा. श्री. विजय राठोड यांची मुलगी कुमारी मानसी राठोड यांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबिर व नेत्र बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नुकतीच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बंजारा परिषद जळगाव जिल्हा टीम यांनी केले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती गुजरात राज्य संघटक मा. श्री. राहुल भाऊ राठोड तसेच जळगाव जी. प. सदस्य दीपक राजपूत, नितीन नाईक रा.बं.प संघटक, जिल्हा उपाध्यक्ष देविदास पवार, मीडिया प्रमुख अनिल तंवर, जामनेर तालुका अध्यक्ष पप्पू तंवर तसेच जामनेर तालुका मीडिया प्रमुख महेश तंवर पूर्ण रा. बं. प. टीम यांची उपस्थिती होती.विजय राठोड यांनी बंजारा समाज संगठीत करण्यासाठी आम्ही पुर्ण जबाबदारी पार पाडू आणि सर्वाना सेवालाल महाराजांच्या सफेद झेंड्याखाली येण्यास सांगितले. तसेच राहुल भाऊ राठोड यांनी बंजारा समज नुसता महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातून एक जुटीने कार्य करावेत अशी घोषणा केली आणि प्रतेक राज्यात आपल्या संघटने मार्फत योग्य उमेदवार निवडून देण्यात यावे अशी माहिती दिली.
Tags
news
