*कै.धर्मवीर आनंद दिघे जलतरण तलावाचे ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*
✍️पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे
ठाणे,दि.२७ :- राज्याचे नगरविकास,सार्वजनिक बांधकाम मंत्री अन् गडचिरोली-ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते बाळकुम येथील कै.धर्मवीर आनंद दिघे जलतरण तलावाचे लोकार्पण आज सायंकाळी संपन्न झाले.
याप्रसंगी खासदार राजन विचारे,आमदार रवींद्र फाटक,उपमहापौर सौ.पल्लवी कदम,सभागृह नेते अशोक वैती,स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती संजय भोईर,आयुक्त डॉ.विपिन शर्मा,स्थानिक नगरसेवक देवराम भोईर,सौ.उषा भोईर,सौ.प्रियंका पाटील, सौ.निशा पाटील,भूषण भोईर,अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आदी पदाधिकारी,पत्रकार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी प्रास्ताविक करून सदर जलतरण तलावाची रूपरेषा विशद केली.दरम्यान ना.एकनाथजी शिंदेसाहेब आणि अन्य प्रमुख पाहुण्यांचे यावेळी स्मृतीचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तदनंतर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणे महापालिकातर्फे राबविल्या जाणारे विविध जलतरण तलाव आणि अन्य लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.यापुढेही ठाणेकरांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत,असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले की,कै.धर्मवीर आनंद दिघे यांचे बाळकुमशी अटूट नातं होतं.या पार्श्वभूमीवरच या जलतरण तलावाचे नाव कै.धर्मवीर आनंद दिघे हे देण्यात आलं.खरं तर, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचीच ही खरी पुण्याई आहे,असे गौरोदगार भाईंनी काढले.ना.शिंदेसाहेबांनी यावेळी स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांचे कौतुक केलं.कारण त्यांनी या तलावाच्या उभारणीसाठी सिंहाचा वाटा दिला.हा तलाव वर्ल्ड क्लास गुणवत्तेचा असून,ठाणे जिल्ह्याने देशाला तरबेज २०० जलतरणपटू दिले आहेत,अशी माहिती ना.शिंदेसाहेबांनी दिली.खेळाडू ही मौल्यवान ॲसेट असून,शहराचे वैभव आहे.त्यांच्यात जे पोटेन्शियल आहेत,त्यांना वाव देण्याचे काम ठाणे महापालिका सातत्याने करत आहे.त्यामुळे ठाणे ही आज जलतरणपटुंची खाण म्हटली जाते.या अनुषंगाने त्यांच्यासाठी क्रीडाविषयक अद्यावत सुविधा उपलब्ध दिल्याच पाहिजेत.त्यांच्यामुळे आपल्या शहराचे नावलौकिक वाढत आहे,असे उदगार त्यांनी याप्रसंगी काढले.यावेळी ना.शिंदे साहेबांनी ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्या विविध योजना राबविण्यात येत आहेत,त्याची सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी शिंदे साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात जलतरणपटू श्री.राजाराम खाग अन् कु. सई पाटील व अन्य खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी दिव्यांग,मतिमंद,अंध जलतरणपटुंनी आपली प्रात्यक्षिके सादर केली.त्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने मोठी दाद दिली.जय 🚩महाराष्ट्र 💐🙏
Tags
news
