महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..! मुंबई सेंट्रल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)



                     मुंबई , दि- ३ मुंबई सेंट्रल येथे बी.आय.टी चाळ परीसरात असलेल्या गेली ८६ वर्षे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर गावडे , प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र नरवणकर , समाजसेवक दिपक अंकलेश्वरीया , जगदिश सोळंकी , सिनेदिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे , ज्येष्ठ पत्रकार शिवदास शिरोडकर , पत्रकार मिलिंद आरोलकर, माजी नगरसेवक अरविंद बने उपस्थित होते . राजेंद्र लकेश्री यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या ८६ वर्षाच्या कारकीर्दीचा थोडक्यात परीचय उपस्थितांना करवून दिला .उपस्थित मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यांचे मार्गदर्शन उपस्थित तरुण वर्गाला लाभले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सरचिटणीस महादेव लेपकर तसेच सुरेश जाधव , नथुराम खोत , सुरेश कणसे आदींनी परीश्रम घेतले .


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने