नांदुरा हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करा या बाबत निवेदन व आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी- जीवनसिंग राजपूत

 


नांदुरा तालुक्यात अवैध धंदे खूप प्रमाणात फोफावले आहेत. अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेकांची दर महीन्या ला 50 लाखा पेक्षा जास्त कमाई होत असून तरुण पिढी बरबाद होत आहे
बायोडिझेल चे सर्व अवैध पेट्रोल पंप बाकी ठिकाणी बंद असताना नांदुरा पो स्टेशन चे हद्दीत २६/२७ पंप नँशनल हायवे 6 व ईतर रस्त्यावर चालू आहेत. तसेच घर खाजगी पत्त्याच्या जुगाराला परमीशन दिलेले असून असे 20/22 प्रायव्हेट क्लब चालू आहेत. तसेच अवैध वाहतूक सर्व च रस्त्यावर चालू असून  काळी पिवळी कडून प्रतेकी 1000 रू प्रमाणे हप्ता असून 6 ते 7 रस्त्यावर अंदाजे 200 काळी पिवळी चालत आहेत व अंदाज 150/160 अँटो , 120/130 अँपे , व ईतर असे अवैध वाहतूक चालत आहे
 वरील सर्व अवैध धंदे बंद करुन ठाणेदाराचे प्राँपर्टी ची सि बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा आम्हाला नांदुरा पो स्टेशन समोर किवा आपल्या बूलढाणा कार्यालया समोर आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. नंतरच्या कायदा सुव्यवस्थेला आपण जबाबदार राहणार असेदेखील या निवेदनात नमूद आहे सदरचे निवेदन ईश्वर भगवान पांडव व त्यांचे सहकारी यांनी दिले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने