अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना शिरपूर येथील मुस्लिम एज्युकेशन समितीचे पदाधिकारी यांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन





शिरपूर: महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना शिरपूर येथील मुस्लिम एज्युकेशन समितीचे पदाधिकारी व शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडून मिळणाऱ्या शैक्षणिक कर्जात सवलत मिळावी तसेच त्या कर्जावरील व्याज माफ करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.

शिरपूर शहर मुस्लिम एज्युकेशन समितीचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांची धुळे येथे सर्किट हाऊस वर भेट घेतली व निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे त्यांना शैक्षणिक कर्ज भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच घेतलेल्या कर्जावरील संपूर्ण व्याज शासनाने माफ करावे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे त्यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळेल. या निवेदनाच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवेदन देताना शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती जाकिर अहमद शेख नजीर, शिरपूर एज्युकेशनल ट्रस्ट चे संचालक हाजी फिरोज खान याकुब खान काझी, शिरपूर नगरसेवक सलीम शेख रज्जाक खाटीक, शिरपूर माजी नगरसेवक अब्दुल रज्जाक बिस्मिल्ला कुरेशी, शिक्षण मंडळ माजी उपसभापती शेख कमरोद्दीन कुतबोद्दीन यांनी निवेदन दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने