शिरपूर शहरात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन



शिरपूर : शहरात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.

माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम गुरुवार दि. 3 फेब्रुवारी पासून शनिवार दि. 5 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत.
शिरपूर शहादा रोड वरील पीपल्स बँकेच्या एटीएम मागे सिद्धिविनायक कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात कार्यक्रम होत आहेत. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून मंदिर परिसरात महादेव, पार्वती, हनुमान, गजानन महाराज, नंदी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता मूर्तींची शोभायात्रा व कलश यात्रा, शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 1 वाजेदरम्यान मंडप प्रवेश, गणपती पूजन, स्थापन पूजन व अन्य धार्मिक विधी तसेच दुपारी 3 ते 7 वाजे दरम्यान मूर्ती जलाधिवास, स्थापना विधी, अग्नी स्थापना, धान्य अधिवास, हवन असे धार्मिक विधी, शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सर्व स्थापित देवतांचे प्रातः पूजन, मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा संस्कार, होम हवन व दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने