मित्रहो,*शून्यातून विश्व निर्माण करणारे* कर्तुत्ववान लोक समाजात बोटावर मोजण्याइतकेच असतात.त्यातील एक व्यक्ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी येथील शेतकऱ्याचे
सुपुत्र *श्रीमान एकनाथ संभाजी शिंदे*.घरची परिस्थिती साधारण असल्याने रोजगार-व्यवसाय मिळावा,या उद्देशाने आपले नशीब अजमविण्यासाठी त्यांनी थेट *ठाणे* गाठले.प्रारंभी *रिक्षाचालक* म्हणून व्यवसायाला सुरुवात केली.
कालांतराने आपल्या संघटन कौशल्यातून *भाई* हे रिक्षा युनियनचे अध्यक्ष झाले.दरम्यान त्यांचा *ठाण्याचे भाग्यविधाता धर्मवीर आनंद दिघेसाहेब* यांच्याशी संपर्क आला अन् तेथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.विशेष म्हणजे
*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे* यांच्या हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होऊन शिवसैनिकाच्या भूमिकेतून एकनाथ शिंदे यांनी पूर्णक्षमतेने सामाजिक कार्यांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली.कालांतराने वंदनीय दिघेसाहेबांचा विश्वास संपादन केल्यावर शाखाप्रमुख होण्याची भाईंना संधी मिळाली.त्या संधीचं सोनं करून आपल्या कार्यकर्तुत्वच्या जोरावर पुढे त्यांचा *नगरसेवक,आमदार ,ठाणे जिल्हा प्रमुख व नंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री* असा यशस्वी राजकीय प्रवास सुरू झाला आहे.शिंदे घराण्याच्या अश्वमेघाला रोकने आता राजकीय विरोधकांना अशक्यप्रायच आहे.अशा कर्तबगार,लोकहितवादी नेत्याच्या शिंदे घराण्यात ४ फेब्रुवारी १९८७ रोजी एक सुंदर,तेजस्वी तारा उदयास आला.अन् जणू शिव छत्रपतीच्या राज्यात गोरगरीब,निराधार,गरजू लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणारा *रुग्णदुत* च सौ.लताताईंच्या उदरी जन्मास आला.त्या तेजस्वी ताऱ्याचं नाव आहे *श्रीकांत*.
कल्याणचे लोकप्रिय खासदार *डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*.आपल्या हातून पुढील काळातही अधिकाधिक रुग्णसेवा व्हावी अन् कल्याण लोकसभा मतदासंघातील सर्वधर्मीय लोकांना उत्तमप्रकारच्या आरोग्यविषयक अन् पायाभूत सोयी-सुविधा मिळाव्यात,हीच अपेक्षा आम्ही शुभेच्छुक आजच्या मंगलमय दिनी व्यक्त करीत आहोत.
सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या कारणांमुळे भाईंना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले.परंतु त्यांनी श्रीकांतदादांच्या शिक्षणासाठी कसलीही कमतरता भासू दिली नाही.डॉक्टर होऊन समाजातील निराश्रित,निर्धन लोकांची आरोग्य सेवा करण्याची मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाईंनी आपली शक्ती पणाला लावली.अन् सुदैवाने आई जगदंबेच्या आशिर्वादानं श्रीकांतदादांनी नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमधून आधी *एम.बी.बी.एस.आणि त्यानंतर एम.एस.(आर्थो.)* ह्या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदव्या मोठ्या गुणांनी संपादन केल्या.त्यातून मुलाची महत्वाकांक्षा सिद्धीस आली तर,आईवडिलांचं स्वप्न साकार झालं.श्रीकांतदादांच्या सन्माननीय मातोश्री सौ. लताताई एकनाथ शिंदे यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता.त्यांना आकाश ठेंगणं वाटू लागले होते.राजमाता जिजाऊंना शिवबाचा राज्याभिषेक होऊन ते *छत्रपती* झाल्यावर जो आनंद झाला होता,तसाच काहीसा आनंद आपला सुपुत्र *श्रीकांत* हा उच्चविद्याविभूषित होऊन डॉक्टर झाल्यावर आईसाहेबांना झाला.अत: श्रीकांतदादांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
पण दादांच्या मनात काही वेगळंच होतं.केवळ डॉक्टर होणं पुरेसं नाही.तर लोकप्रतिनिधी होऊन आपण पार्लमेंटमध्ये गेलोत,तर ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लोकांना आपण उत्तम आरोग्यसेवा आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून न्याय देऊ शकू.या पार्श्वभूमीवर श्रीकांतदादांची राजकीय दिशेने वाटचाल सुरू झाली.शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दादांना कल्याण लोकसभेचे तिकीट मिळालं.भाग्याचा तो दिवस उजाडला.अन् डॉ.श्रीकांत शिंदे हे *२०१४ च्या लोकसभा* निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्री.आनंद परांजपे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.या विजयातून श्रीकांतदादा हे लोकसभेतील सर्वाधिक तरुण खासदार म्हणून नावरूपाला आले.त्यावेळी ते एम.एस.च्या फायनल ईयरला होते.अन् त्यांचं वय अवघे २७ वर्ष होतं.तनमनधनाने केलेल्या रुग्णसेवेनं दादांनी जनमानसाच्या हृदयात मानाचं स्थान प्राप्त केलं आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे यांनी devotion, determination & dedication या त्रय तत्वांचा अंगिकार करून आपल्या मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला आहे.त्यामुळे राजकारणातून समाजकारण* करणाऱ्या खासदारसाहेबांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.त्याची परिणती अशी झाली की,श्रीकांतदादा हे *२०१९ मधील लोकसभा* च्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्याण-डोंबिवली क्षेत्रातून पुनश्च विजयी होऊन त्यांनी आपले प्रतिस्पर्धी श्री.बाबाजी पाटील यांना मोठ्या फरकाने पराजित केलं.खरं तर,हीच त्यांच्या कठोर परिश्रम अन् लोकसेवेची खरी फलश्रुती आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.खासदारसाहेबांची प्रामाणिकता आणि कार्यतत्परतेने लोकसभेचा विश्वास संपादन केला.त्यामुळे दादांच्या लोकसभेतल्या सात वर्षाच्या काळात त्यांची महत्वाच्या केंद्रीय कमिटींवर नियुक्ती झाली. सदस्य,स्टँडिंग कमिटी( आरोग्य व कुटुंब कल्याण) ; सदस्य,स्टँडींग कमिटी (संरक्षण/ डिफेन्स ); सदस्य,सल्लागार कमिटी ( गृह निर्माण/नागरी व्यवहार ) ; सदस्य,कमिटी ऑफ व्हायलेशन ऑफ प्रोटोकॉल नॉर्मस ऑफ गवर्नमेंट ऑफिसर्स विथ लोकसभा मेंबर्स ह्या प्रमुख कमिटींचा समवेश आहे.तात्पर्य,डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खासदार म्हणून *लोकसभेत युवाशक्तीच्या कार्यक्षमतेची खरी ओळख* करून दिली,याचा शिवसैनिकांना मोठा अभिमान आहे.
*हर कामियाब इंसान के पिछे औरत का हाथ होता है*,ही गोष्ट श्रीकांतदादांच्या बाबतीत खरी ठरली आहे.त्यांची सुविद्य पत्नी सौ.वृषालीताई ह्या सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.त्यामुळे दादांचे मनोबल द्विगुणित होऊन ते रुग्णसेवेत मोठ्या जोमाने कार्यमग्न होतात. *मा.श्रीकांतदादा अन् सौ. वृषालीताई यांची जोडी जणू लक्ष्मी-नारायण सारखीच* आहे. या दाम्पत्याचा एक गोंडस सुपुत्र आहे,त्याचं नाव कु.रुद्रांश.श्रीकांतदादा हे स्वतः खूप *हेल्थ कॉनशियस* असल्याने त्यांना व्यायाम,जॉगिंग करणे तसेच क्रिकेट व फुटबॉल खेळण्याची खूप आवड आहे.या पार्श्वभूमीवर त्यांची नुकतीच *ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड* झाली आहे.जगातील विविध देशांचा दौरा करून तेथील नागरिकांचे जीवनमान,सांस्कृतिक वैभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याची माहिती संकलित करणं,हे दादांचे आवडीचे विषय आहेत.वाचन करणं,चित्रपट पहाणं हे त्यांचे छंद आहेत.आतापर्यंत डॉक्टरसाहेबांनी युरोप,मलेशिया, मालदीव, सिंगापुर,थायलॅन्ड,यु.के., यु.एस.ए.या देशांना भेटी दिल्या आहेत.याशिवाय अमेरिकेत भरलेल्या एफआयसीसीआय परिषदेत डॉ.शिंदे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं.असा बहुआयामी युवा नेता कल्याण डोंबिवलीकरांना लाभला,ही त्यांच्यादृष्टीने भाग्याची गोष्ट आहे.
कल्याण डोंबिवलीचे खासदार या नात्याने त्यांनी या क्षेत्रातील चाकरमान्यांची सोय व्हावी,या उद्देशाने अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली,कळवा, दिवा,ठाकुर्ली,कोपर या स्थानकांचा सर्वांगीण विकास घडवून आणला.गर्दीच्या वेळेत लोकल प्रवाश्यांना त्वरेने तिकिटे मिळावीत,यासाठी या क्षेत्रातील स्थानकांवर *एटीव्हीएम मशिन्स* बसविलेत.याशिवाय सर्व वयोगटातील प्रवाश्यांचा जिना चडायचा शारीरिक त्रास वाचावा,याकरिता *लिफ्ट व एस्कलेटरची उभारणी* केली.नागरिकांना स्वच्छ व अल्पदरात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे,म्हणून *वॉटर डिस्पेन्सर* सुरू केलेत.त्यामुळे पैश्यांची बचत होऊन प्रवाशांची तहान भागत आहे. श्रीकांतदादांच्या पाठपुराव्याने कल्याण स्थानकाला पूर्व भागाशी जोडण्याच्या उद्देशाने *लोकग्राम पूल* च्या पुनर्निर्माण कामास लवकरच सुरुवात होणार आहे.त्यामुळे कल्याण पूर्वेकडील नागरिकांना होणारा त्रास वाचेल.आपल्या क्षेत्रातील जनतेची सदैव कणव करणारा लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थानं लोकनेता होऊ शकतो,हे डॉ.श्रीकांत शिंदेने कृतीने सिद्ध केलं आहे.यालाच खऱ्या अर्थानं *लोकाभिमुख दृष्टी* असलेला खासदार म्हणतात.
सर्वात उल्लेखनीय कामगिरी खासदारसाहेबांनी केली ती म्हणजे कल्याणच्या पत्रीपुलाचे पुनर्जीवन होय.सुमारे १०४ वर्षांपूर्वीचा इंग्रजांच्या काळातला हा पूल जुना व जर्जर झाला होता.त्यामुळे तो रहदारीसाठी धोकादायक बनला होता.या पार्श्वभूमीवर डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वेचे उच्चाधिकारी यांना विश्वासात घेऊन या *कल्याण पत्रीपुलाची पुनर्बांधणी* केली.कोरोना लाटेची तमा न बाळगता, हैद्राबादला स्वतः जाऊन श्रीकांतदादांनी पुलाचे गर्डर कल्याण येथे आणून मोठं धाडसी काम केलं,याची सर्वत्र स्तुती झाली.महत्वाची गोष्ट म्हणजे पुलासंदर्भात बिनबुडाची टिकाटिपणी करणाऱ्या राजकीय विरोधकांचे तोंड पूल उभारून कायमचे बंद केलं.या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे कल्याण,डोंबिवली अन् आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची उत्तम सोय होऊन वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटली आहे.यास्तव सर्वधर्मीय नागरिकांनी खासदारसाहेबांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
कुठलाही पब्लिक प्रोजेक्ट मार्गी लावण्याचा दृढसंकल्प करून त्याचा पाठलाग करत,पाठपुरावा करत,तो लोकार्पण करेपर्यंत थांबायचे नाही,ही दादांची *रिझल्टओरियन्टेड कार्य पद्धती* आहे.याशिवाय मेट्रो प्रकल्प आणि हायवेवरील फ्लायओवर,रेल्वेपूल,पादचारी पूल,उड्डाणपूल,सॅटिक उभारण्याची कामेदेखील खासदारसाहेबांच्या प्रयत्नातून काही पूर्ण झाली तर,काही प्रगतीपथावर आहेत.*नावाळी* गावातील जमीन आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी मिळवून देण्याचा खासदारसाहेबांनी निर्धार केल्याने ठाणे जिल्ह्यातील १४ गावांमधील ग्रामस्थांची आरोग्यविषयक मोठी सोय होणार आहे.भविष्यात ग्रामस्थांना आजारपणात मुंबई व अन्य ठिकाणी उपचारार्थ जाण्याची वेळ येणार नाही.*कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गाजवळील झोपडपट्टींना* हटविण्याचा रेल्वे मंत्रालयाने इशारा दिला असता,या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी झोपडपट्टीवासियांची भेट घेऊन त्यांना धीर देत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत बेघर होऊ देणार नाही,असे अभिवचन दिलं.त्यामुळे येथील रहिवाश्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी दादांचे आभार मानले.खासदार साहेबांच्या अथक प्रयत्नांतून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन स्थानकांमध्ये *चिखलोली* हे नवे स्थानक येत्या अडीच वर्षात निर्माण होईल.त्यामुळे तेथील ग्रामस्थांना *लोकल सेवा* उपलब्ध होऊन त्यांना अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकांवर येण्याची गरज भासणार नाही.त्यातून स्थानिक लोकांचा वेळ,पैसा वाचून त्यांची प्रवास सोय होईल.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्रालय,राज्याचा नगरविकास विभाग अन् ठाण्याचे महापौर श्री.नरेश म्हस्के यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून खारीगाव रेल्वेपुलाचे काम धसास लावले.राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर पुलाचे उद्घाटन होऊन त्याचं लोकार्पण झाल्याचं याप्रसंगी जाहीर करण्यात आलं. त्यामुळे तेथील अपघाती रेल्वे फाटकातून रहिवाश्यांची सुटका झाली,तर वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळाला.परंतु मानवीय दृष्टिकोनातून विचार केला तर,कळवा पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही बाजूच्या रहिवाश्यांची मने जोडली गेलीत,ही जमेची बाजू असून,त्यातच खऱ्या अर्थानं आनंद सामावलेला आहे.वास्तवात *Work is worship*हे खासदारसाहेबांच्या दृष्टीने महत्वाचे*,हे प्रामुख्याने सांगणं आहे.
*डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वमुळे त्यांचा १७ व्या लोकसभेच्या अहवालात पहिल्या ५ खासदारांमध्ये समावेश होणे ही केवळ ठाणेकरांच्या दृष्टीने नव्हे तर,साऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.यास्तव दादांचे मनस्वी अभिनंदन.इतकेच नव्हे तर,भारतातील ख्यातनाम मासिक इंडिया टुडे द्वारे देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १०० मान्यवरांची यादी जाहीर केली.त्यातील १२ मान्यवर हे राजकीय क्षेत्रातले असून,त्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांचा समावेश आह.लोकसभेत लोकांच्या सर्वाधिक प्रश्नांना वाचा फोडणारे खासदार म्हणून श्रीकांतदादांची गणना झाली आहे.याबद्दल महाराष्ट्रीय जनतेतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन*.
एक हजार वर्षांपूर्वीचे *अंबरनाथ स्थित शिवमंदिराचे सुशोभिकरण अन् त्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा* देऊन त्याचा सर्वांगीण विकास करण्यास डॉक्टरसाहेबांनी प्राधान्य दिलं आहे.या प्रयोजनासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी राज्य सरकारकडून ४३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.शिवभक्तांसाठी हे पुराणकालिन मंदिर तीर्थस्थळ,तर ज्येष्ठ नागरिक अन् शाळेकरी मुलांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनलं आहे.याशिवाय बालगोपालांसाठी येथे गार्डन,स्विंग,स्लाईड आदी खेळांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यातून लहान मुलं-मुली आनंदी होऊन मजा लुटताना दिसतात.भारताला हजारो वर्षांची आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे.त्याचाच एक भाग म्हणून तिचे जतन,रक्षण अन् संवर्धन करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या तीर्थस्थानाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून कायापालट केला आहे.लोकोपयोगी कामे करत,भगवे हिंदुत्व जपणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे,यापासून सर्वांनी धडा घ्यावा.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गे दुर्गेश्वर किल्ले रायगड येथील छत्रपतींच्या पुतळ्याला *अखंड पुष्पहार अर्पण* करण्याचा पायंडा पाडण्याचा मान डॉ.श्रीकांत शिंदे यांना जातो.यास उपक्रमास ११ महिने पूर्ण झाले आहेत.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेन्ट,करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या अद्वितीय संकल्पनेची *खासदार छ्त्रपती संभाजी महाराज यांनी श्रीकांत दादा अन् चिवटे सरांची मुक्तकंठाने प्रशंसा* केली.अखंड पुष्पहार अर्पण करण्याच्या स्तुत्य उपक्रमामुळे शिव छत्रपतींच्या एतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला,याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो.
*महाड दुर्घटने* मध्ये मरण पावलेल्या कुटुंबियांच्या दोन मुलांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने दत्तक घेतले असून,त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.इतकेच नव्हे तर,त्यांच्या नावावर बँकेत प्रत्येकी १० लाख रुपये मुदत ठेवीत गुंतविले आहेत.*नमन शिंदे* या एक वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी हृदयाचे ऑपरेशन करणे तातडीचे होतं.यासंदर्भात पालकांनी श्रीकांतदादाशी संपर्क साधला.त्यानंतर लगेचच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्यावतीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या बालकाचे ऑपरेशन करून त्याला जणू नवजीवन प्राप्त करून दिलं. संकटप्रसंगी मदतीचा हात दिल्याने *डॉ.शिंदे यांच्या स्वभावातल्या माणुसकीचे शाश्वत दर्शन* झालं,याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.खरं तर,यापेक्षा मोठं पुण्यकर्मच नाही.याबद्दल त्याच्या पालकांनी दादांचे मनपूर्वक आभार मानले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले होते.यावर सुयोग्य तोडगा काढून डॉक्टरसाहेबांनी हातापोटावर उदरनिर्वाह करणाऱ्या आपल्या मतदारसंघातील सुमारे *५५ हजार रिक्षाचालकांना अन्नधान्य*, अन्य जीवनावश्यक वस्तू,मास्क,सानेटायझर आदी उपयुक्त साहित्याचे वाटप केले.पैश्याअभावी कोणाची उपासमार होऊ नये,ही मानवीय भावना मनाशी ठेऊन दादांनी ही मदत केल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.
लॉकडाऊनमुळे दीड-दोन महिन्यापासून राज्यातील काही विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकून पडले होते.त्या विद्यार्थ्यासाठी एस. टी.बसेसची व्यवस्था करून त्यांना आपल्या जिल्ह्यांमध्ये सुखरूप पोहोचविले.ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खासदारसाहेबांना धन्यवाद दिले.*आपत्तीग्रस्त लोकांच्या मदतीला धाऊन जाणे,हा शिंदे परिवाराचा राजधर्म* आहे,असेच म्हणावे लागेल.
अशीच वेळ दिल्लीत गेलेल्या राज्यातील *प्रशासकीय सेवेतील उमेदवारांवर* बितली होती.दादांना या गोष्टीची भनक लागताच त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी संपर्क करून *त्या* उमेदवारांसाठी ट्रेनमध्ये स्पेशल डब्याची व भोजनाची व्यवस्था केली.एवढं करून दादा थांबले नाहीत.ते चक्क रात्री दोन वाजता *त्या* उमेदवारांच्या स्वागतासाठी कल्याण स्थानकावर एकटे वाट पहात होते.यालाच म्हणतात खरी समर्पणवृत्ती.याबद्दल श्रीकांत दादांवर कौतुकाचा वर्षाव झाला.अशीच एक घटना पुढे घडली.लॉकडाऊनमध्ये कल्याणचे कांतीलाल ठाकूर कुटुंब हरिद्वार येथे देवदर्शनास गेले असता,ते तेथेच अडकून पडले.त्यांनी खासदारसाहेबांशी फोनवर संपर्क साधला.दादांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिल्ली येथे त्यांच्या राहण्याची-भोजनाच्या व्यवस्थेसह त्यांच्या रेल्वे प्रवासाची सोयही करून दिली.कल्याण येथे सुखरूप पोहोचल्यावर ठाकूर वृद्ध माता-पिताने दादांचे मनस्वी आभार मानून त्यांना सुयश चिंतिले.*समाजातील गरजू,निराधार लोकांचे आधारवड बनून त्यांना मायेचा आधार देण्याची शिकवण शिव छत्रपती आणि फुले-शाहू-आंबेडकर यांनी भारतीयांना दिली*.त्या विचाराचे श्रीकांतदादांनी अनुपालन केलं असल्याचे सिद्धीस येते.
मित्रहो,साऱ्या जगाला कोरोना महामारीने ग्रासले असताना मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे अन् पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे अन् कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या पिता पुत्राने केवळ ठाणे,कल्याण पुरता विचार न करता, राज्यातील सर्वधर्मीय लोकांचा कोरोना व्हायरस, डेल्टा,ओमायक्रोनसारख्या नवनवीन व्हायरन्टपासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर ठोस उपाययोजना केल्या.हॉस्पिटल्समधील कोरोनाग्रस्त रुग्णांना थेट भेटू नका,अशी डॉक्टरांनी विनंती करूनही शिंदे पिता-पुत्राने आपल्या जीवाची पर्वा न करता,पीपीई किट घालून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना मानसिक आधार दिला.तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मायेची फुंकर घातली.*शिंदे पिता-पुत्र हे खऱ्या अर्थानं जणू *माणुसकीचा झरा* आहेत,अशी उपमा त्यांना देणं सार्थक ठरेल.
*आधी करून दाखवतो,मग बोलतो* या शिवसेनेच्या ब्रीद संकल्पाच्या अनुषंगाने,शिंदे पिता-पुत्राने हजारो रुग्णांचे प्राण वाचविले.*दरम्यान या दोघा लोकनेत्यांना दोन-दोन वेळा कोरोनाची लागण होऊन देखील क्षत्रिय बाणा जागवत त्यांनी मोठ्या धैर्याने कोरोनावर मात केली*.अन् लगेचच कोरोनाबाधित बंधू- भगिनींच्या मदतीला धावून गेले.वास्तवात विश्रांती,उसंत,विसावा,आराम,हे शब्द त्यांच्या डिशनरीतच नाहीत,असं प्रकर्षानं दिसून येतं.कारण प्रकृती बरी होताच,*ते* जनताजनार्दनाच्या रक्षणासाठी पुनश्च कोरोनाशी लढा देण्यास सज्ज झाले. शिंदेपरिवार हे मूळचे शिव छत्रपतींच्या सातारा येथील रहिवाशी असल्याने जनसेवा, निडरता अन् साहसीवृत्ती त्यांच्या रक्तात भिनली असल्याने हा त्याचाच परिपाक आहे.
*रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा* हे ब्रीद अंगिकार करून कोरोना रुग्णांच्या जिवांचे रक्षण करण्याचा प्रण ना.एकनाथ शिंदे अन् खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.मा.शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेले वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे संयुक्तपणे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यभर भ्रमण करून आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत अन् तेथील गोरगरीब,निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधे वाटप करत आहेत.या शिबिरांमुळे कोरोना महामारीच्या काळात सर्वधर्मीय लोकांच्या आरोग्याचे रक्षण होत आहे.सदर *शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यातल्या २४ जिल्ह्यात जाळे पसरले* असून,आजमितीपर्यंत राज्यात सुमारे *१०० आरोग्य शिबिरे* आयोजित केली गेली आहेत.त्यात सुमारे पाच लाखाहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.या आरोग्य मोहिमेची धुरा मदत कक्षाचे *राज्य समन्वयक श्री.मंगेश चिवटे* यांच्या सक्षम हाती दिली असून,ते त्यांच्या कृतिशील टीमसह पूर्णक्षमतेने रुग्णसेवेत कार्यरत आहेत.त्यांच्या रुग्णसेवेतील मानवीय दृष्टिकोन,प्रामाणिकपणा व कार्यतत्पुरतेची मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे,ना.एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.राजेशजी टोपेसाहेब,खासदार छ्त्रपती संभाजी महाराज,राज्यमंत्री बच्चू कडु आदी मान्यवरांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एम.एस.ही वैद्यकीय शिक्षणातील उच्चतम पदवी संपादन केली असल्याने त्यांना साथीचे आजार असो वा कोरोनासारखी महामारी,त्यावर रामबाण इलाज कसा करावा,याचे तंतोतंत ज्ञान आहे.त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना कोरोना नियंत्रित करण्याच्या मोहिमेत मोठं यश आलं आहे.श्रीकांतदादांनी राज्याची सीमा लांघून व्यापक दृष्टिकोनातून *कल्याण डॉक्टर्स आर्मी* सह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची टीम *केरळ* राज्यात पाठवून तेथील पूरग्रस्त लोकांच्या आरोग्य सेवा केली.त्याचप्रमाणे अन्न धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा तेथील राज्य प्रशासनाला सुपूर्द केला.त्यांनी ना.एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे अन् महाराष्ट्र सरकारचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.महाराष्ट्रात जेथे जेथे अतिवृष्टी,इमारत दुर्घटना झाली,चक्रीवादळ आले वा अन्य नैसर्गिक संकटं आलीत,तेथे तेथे श्रीकांतदादांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पथकाने हातात हात घालून आपत्तीग्रस्त लोकांना आरोग्य सेवासह जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.त्याचप्रमाणे बेळगावमधील सीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी रुग्णवाहिका,अन्य वैद्यकीय साधनसामग्री व धनधान्याचा पुरवठा केला.त्यातून *आम्ही प्रथम भारतीय आहोत,नंतर महाराष्ट्रीय* हा धडा बाळासाहेबांच्या शिवसेनेने आख्या देशाला दिला.खरं तर,या हिमालयाएवढ्या औदर्याला कोठे तोडच नाही,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गेल्या तीन वर्षांपासून आयोजित होत असलेल्या आरोग्य शिबिरांचा राज्यातील लाखों लोकांनी लाभ घेतला असून,आपल्या प्रकृतीला निरोगी व सुदृढ ठेवलं आहे.त्याप्रमाणेच ग्रामीण भागातल्या लोकांची कोरोना महामारीसंदर्भात जागृती होऊन ते राज्य सरकारच्या नियमावलीचे चांगल्याप्रकारे पालन करत आहेत.*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन ह्या द्वय सेवाभावी संस्था राज्यातल्या लोकांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत*,असे जनमानसाचे सार्वमत आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे(९फेब्रुवारी) औचित्य साधून डॉ.श्रीकांत शिंदे हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून येथील सुप्रसिद्ध ज्यूपिटर हॉस्पिटलमधील निष्णात डॉक्टरांकडून दरवर्षी राज्यातील गोरगरीब,निर्धन लोकांच्या लहान मुलां-मुलींच्या हृदयावरील छिद्राचे मोफत ऑपरेशन करण्याच्या उद्देशाने विशेष आरोग्य शिबीर भरवित जात असते.या वर्षीही सदर शिबीर भरविण्याचे दादांनी जाहीर केले आहे. *आजपर्यंत सुमारे ४,००० हून अधिक बालकांचे हृदयाचे ऑपरेशन* होऊन ते सुखरूप घरी पोहोचले आहेत.खरं पहायला गेलं तर,ह्या मुलांचा पुनर्जन्मच झाला,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.त्यामुळे पालकांना मोठा सुखद दिलासा मिळाला असून,त्यांनी ना.एकनाथ शिंदेसाहेब,डॉ.श्रीकांत शिंदे अन् श्री.मंगेश चिवटे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहे.
कोरोना महामारीच्या काळात जनतेच्या जिवांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने *कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कोविड-१९ टेस्टिंग लॅब* उभारले.रुग्णांना रक्ताची गरज भासेल आणि रक्ताचा तुटवडा मिटविण्यासाठी दादांनी जागोजागी *रक्तदान शिबिरे* आयोजित केली.सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून युवा शक्तीला रक्तदान करण्यास प्रवृत्त केले.त्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी झाला,हे खासदारसाहेबांच्या परिश्रमाचे फलित आहे.या कामी *कल्याणच्या इंडियन मेडिकल असोसिएशन* ने श्रीकांतदादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महत्वाची भूमिका बजावली.दरम्यान *चिन्मय बोरकर* या सिरीयस कोरोनाग्रस्त रुग्णाला दादांनी वेळीच प्लाझ्मा उपलब्ध करून दिल्याने त्याचे प्राण वाचले.याप्रसंगी डॉक्टरसाहेबांनी रुग्णदुताची भूमिका समर्थपणे बजावली,हे वाखाणण्याजोगे आहे.या संकटजन्य काळात ना.एकनाथ यांच्या आदेशानुसार आणि श्रीकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राज्य समन्वयक श्री.मंगेश चिवटे व टीमने ठाणे-कोपरी येथील मदत कक्षाचे कार्यालय २४ तास खुले ठेऊन केवळ एका फोनच्या रिंगवर गरजू रुग्णांना रुग्णवाहिका,रक्त पुरवठा,हॉस्पिटलमध्ये बेड,ऑक्सिजन पुरवठा आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.याचे सर्वच थरांतून कौतुक झाले.मदत कक्षाच्या सामाजिक बांधिलकी अन् तत्परतेमुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले,ही उल्लेखनीय गोष्ट आहे.याशिवाय
*महेश ढसाळ* यांना हृदय शस्त्रक्रियेसाठी दादांनी वेळीच अर्थसहाय्य दिल्याने ढसाळ यांना नवजीवन प्राप्त झाले,यालाच खऱ्या अर्थानं सत्कर्म म्हणतात. पूर्वाश्रमीचे हिंदकेसरी *श्रीपती खंचनाळे* यांना ऑपरेशनसाठी एक लाख रुपयांची मदत केली.याबद्दल त्यांनी डॉक्टरसाहेबांचे आभार मानले.बीड येथील वैभव वावळकर यांच्या *आठ महिन्याचा चिमुकला शौर्यमन* याच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी दादांच्या सूचनेनुसार २ लाख ३४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.शौर्यमनला जीवनदान मिळाल्याबद्दल त्याच्या पालकाने मा.श्रीकांतदादा व चिवटे यांना धन्यवाद दिले.
राजकारणातून समाजकारण करत दादांनी *दानशूरवृत्ती* चे दर्शन घडविले,याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
*चेस द व्हायरस* या मिशनच्या माध्यमातून डॉक्टरसाहेबांनी कल्याण डोंबिवली क्षेत्रातील ४० झोपड्यापट्ट्या कोरोनामुक्त केल्या.मा.मुख्यमंत्र्यांच्या *माझे कुटुंब माझी जबाबदारी* या संकल्पनेच्या योजनेतून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य पथकाने खासदारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांची कोरोना चाचणी केली.त्यामुळे कुटुंबांतील ज्येष्ठ सदस्यांमध्ये जागृती निर्माण होऊन ते आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लागले आहेत.लॉकडाऊन काळात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ९ गावांची वाढीव घरपट्टी व मालमत्ता करात कपात करून देऊन दादांनी ग्रामस्थांना मोठा सुखद दिलासा दिला.गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या *डोंबिवलीतल्या एमआयडीसीतील रस्त्यांच्या पुनर्निर्माणसाठी खासदार साहेबांनी सुमारे ११० कोटींचा मास्टर प्लॅन* तयार केला असून,त्यातील ५५ कोटी रुपये राज्य सरकार कडून मिळवून दिलेत. याबद्दल येथील रहिवाश्यांनी खासदारसाहेबांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील विविध भागांना १०० रुग्ण वाहिका हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला अन् त्यातील ५५ रुग्णवाहिकांचे ना.शिंदेसाहेबांच्या हस्ते आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे.याबद्दल राज्यातील विविध ठिकाणच्या मान्यवरांकडून दादांना धन्यवाद दिले जात आहे.या कारणांसाठीच *डॉ.श्रीकांत शिंदे यांना Young M.P. in a hurry* असे संबोधिले जाते.
याशिवाय *श्रीकांतदादांच्या प्रयत्नातून १२००० हून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे कॅन्सर,ब्रेन ट्युमर,किडनी ट्रान्सप्लांट,लिव्हर ट्रान्सप्लांट,बायपास, एंजियोलास्टी,मोतीबिंदू आदी तत्सम ऑपरेशन्स मोफत झाले आहेत*.सदर रुग्णांना श्रीकांतदादांच्या मार्गदर्शनाखाली मदत कक्षाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्यता निधी आणि सेवाभावी धर्मदाय संस्थांकडून सुमारे ५५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.इतकेच नव्हे तर,डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने जी उल्लेखनीय रुग्णसेवा केली आहे,ती वैद्यकीय क्षेत्रातल्या संस्था अन् मान्यवरांना पथदर्शक ठरेल,हे निश्चित. महत्वाचे म्हणजे यातून गोरगरीब,गरजू लोकांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. तात्पर्य,*रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा* हे प्रत्यक्ष कृतीने साध्य करून ना.एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोठं पुण्यकर्म केलं आहे.राजकारणातून समाजकारण करण्याची वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांची शिकवण आत्मसात करून आदरणीय आई-वडिलांच्या आशिर्वादाने श्रीकांतदादांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात कोरोनावर मात केली,याचा आम्हा शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.
कल्याण डोंबिवलीचे दमदार,शानदार, वफादार,पाणीदार,बाणेदार व कर्तबगार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्या हातून भविष्यातही अशीच नेत्रदीपक रुग्णसेवा घडो,हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.जय🇨🇮हिंद - जय🚩महाराष्ट्र!
*लेखक - रणवीर राजपूत*
*प्रसिद्धी विभाग,वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,ठाणे*
Tags
news
