शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहार मागील वीस ते एकवीस दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असून व्यापारी व हमाल मापाडी यांच्यातील दरवाढ व यांचे कमिशन यावरून अंतर्गत वाद आहेत त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहार बंद आहे त्यामुळे यावर तात्काळ तोडगा काढून कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन महा. उप-निबंधक सो. सहकारी संस्था कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर यांना माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकार आबा जाधव यांनी दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की गेल्या २०/२१ दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री बंद आहे. आपल्या तालुक्यातील सर्व साधारण जनता आधीच साखर कारखाना बंद असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या उस तोडणी होत नसल्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असून रोज शेतकरी आत्महत्या करतोय त्यात उर्वरित पिकांसाठी एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती चालू होती म्हणून शेतकरी काहीतरी माल विकून आपला उदरनिर्वाह करत होता परंतु २०/२१ दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे लोकांना काही एक पर्याय उरत नाही
तरी येणाऱ्या दि. ०८/०२/२०२२ पासून कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ववत सुरु करावी अन्यथा आम्ही सर्व शेतकरी, सामाजिक संघटना व इतर सर्व शेतकऱ्यांचे हितचिंतक मिळून रुमणे, पुराने मोर्चा घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर जण आंदोलन करण्यात येईल. त्यात होणाऱ्या परिणामास बाजार समिती व शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील . याबाबत प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांना देखील निवेदन सादर करण्यात आले आहे
Tags
news
