धुळे : धुळे येथे एस.व्ही.के.एम. संचलित एन.एम.आय.एम.एस. स्कूल ऑफ कॉमर्स येथे पालक मेळावा संपन्न झाला.
एन.एम.आय.एम.एस., स्कूल ऑफ कॉमर्स येथे बुधवार दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी प्रथम वर्षाचे विद्यार्थी, पालकांचा मेळावा घेण्यात आला. एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठ मार्फत दरवर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात येतो. परंतु यावर्षी कोविड-१९ प्रादुर्भावामुळे ओरिएंटेशन प्रोग्राम हा यापूर्वी ऑनलाईन घेण्यात आला होता, म्हणून स्कूल ऑफ कॉमर्सचे इन्चार्ज असोसिएट डीन सी.ए. कुणाल पसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. मेळाव्यात कॉलेजमधील विविध उपक्रमांची माहिती तसेच प्रथम सत्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अहवाल पालकांना देण्यात आले व पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सदर मेळावाचे यशस्वी नियोजन स्कूल ऑफ कॉमर्सचे इन्चार्ज असोसिएट डीन सी.ए. कुणाल पसारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आस्था शर्मा, राजेंद्र अग्रवाल, सी.ए. पूजा सदाने, नेहा तनेजा तसेच सर्व कर्मचारी यांनी केले.
Tags
news
